हत्तुर येथील ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरात नारळ वाढवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ.



प्रतिनिधी-सोलापूर
 २५१,सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हत्तुर येथील ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी प्रचार सभेत संतोष पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,तालुक्यातील धनाढ्य आणि प्रस्थापित नेत्यांनी स्वार्थासाठी केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे आणि परस्पर पूरक भूमिका घेऊन तालुक्याला प्रश्न न सोडवता तालुक्याला आता या स्वार्थी राजकारणाला आळा घालण्याची आणि तालुक्याच्या खऱ्या हितासाठी काम करण्याची वेळ आल्याचे ठामपणे सांगण्यात आले.



 तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून जनता सजग होऊन, प्रस्थापित नेते आणि घराणेशाही विरोधात ठाम भूमिका घेत परिवर्तन घडवून आणेल,जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने मी आमदार होऊन सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी,कामगार ,बेरोजगार यांचे प्रश्न सोडवणार तसेच मतदारसंघाचा जो विकास रखडला आहे. तो विकास पूर्णत्वास घेऊन जाणार भेडसवणारा पाणी प्रश्न सोडवणार असून बेरोजगारांच्या हाताला एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे काम हाती घेणार.विविध तालुक्यामधून माझा गाव भेटीचा दौरा हा सुरूआहे.त्या दौऱ्यामधून मला सर्वसामान्य जनतेमधून, वंचित, बहुजन समाज त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना विविध जाती जमाती मधून मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असून त्यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी विजयी होणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी आतिश बनसोडे, सोमलिंग कणपडियर, बिळेंनी कनपडियर, बंडप्पा पाटील, राजू गडदे, काकासाहेब माने, रवींद्र इंगळे, भरमन्ना गावडे, प्रकाश पवार, लक्ष्मण राठोड, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष - विजयकुमार गायकवाड , शहराध्यक्ष - प्रशांत गुडेवार ,सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष - सुरेश देशमुख , सह सचिव - शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक - उत्तम दिलपाक, विक्रम गायकवाड, सायरा शेख , असिफ यत्नाळ संतोष राठोड , अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार, आदी उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर