आण्णा दिक्षित यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; रयत शिक्षण संकुलामध्ये जल्लोष.



प्रतिनिधी-सोलापूर
रावजी सखाराम हायस्कूलचे सहशिक्षक आण्णा बाबु दिक्षित यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने बेळगाव येथे सन्मानित करण्यात आले. हे वृत्त समजतच रयत शिक्षण संकुल जल्लोष करण्यात आला.

इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील निवडक शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार सोहळा  बेळगाव येथे संपन्न झाला.   प्रमाणपत्र, विशेष सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार व मा‌. केंद्रीय मंत्री  यांच्याकडून अभिनंदन पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते .
आण्णा दिक्षित उत्तम गणित शिक्षक असून  लेखक, कवी व उत्तम वक्ते आहेत. शिक्षणशास्त्र विषयाच्या अनुषंगाने त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विविध शाळा व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे. ते उत्तम मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांना संगणकाचेही उत्तम ज्ञान आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ तयार केले आहेत. त्यांनी एक वर्ष सिनियर कॉलेज, दोन वर्षे इंजिनिअरिंग कॉलेज, आठ वर्ष पॉलिटेक्निक कॉलेज, तीन वर्षे ज्युनिअर कॉलेज मध्ये काम केलेले आहे. सध्या 2021 पासून ते रावजी सखाराम हायस्कूल मध्ये गणित विषयाचे सहशिक्षक म्हणून काम पाहत आहेत ते विद्यार्थ्यांना आठवी एन.एम.एम.एस. व शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देखील करतात. रावजी सखाराम हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांमध्ये देखील त्यांची प्रचंड  क्रेझ आहे. फेसबुकवर चार हजाराच्या वर माजी विद्यार्थ्यांना संग्रहित करण्यात त्यांनी यश संपादन केले आहे. 
नुकताच त्यांना विद्या विकास प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांना सुवर्णपुष्प संस्था, महाराष्ट्र मार्फत पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात समाज भूषण पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा सोलापूर तर्फे 2022-23 समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ते अष्टपैलू व उपक्रमशील शिक्षक असून उच्चशिक्षित आहेत.अण्णा दीक्षित यांनी आत्तापर्यंत बी.एस्सी., एम.एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम.ए. इंग्लिश, बी.एड., एम.एड., डी.एस.एम., एम.सी.जे. अशा एकूण 7 पदव्या प्राप्त केल्या आहेत. 
7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे घेतलेल्या परीक्षेत ते शिक्षणशास्त्र विभागातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते शिक्षणशास्त्र विभागातून पीएच.डी. करत आहेत. 
रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम हायस्कूलमधील सर्व उपक्रमात हिरारीने सहभाग घेऊन प्रशालेची प्रगती व्हावी यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांचा विकास साधणारे आण्णा दिक्षित यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, संस्था सदस्य प्राचार्य डॉ सुरेश ढेरे, स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य केतनभाई शहा, उद्योजिका माधुरी ताई पाटील, प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर, प्राचार्य संतोष वालवडकर, प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना सर्वगोड, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख अमर देशमुख, ज्येष्ठ शिक्षिका चंद्रकला भोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर