तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात दत्तयाग संपन्न.

प्रतिनिधी - अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरातश्रावण अधिक मास निमीत्त आयोजीत ३ दिवसीय दत्तयाग दिनांक २५ जुलै ते दिनांक २७ जुलै अखेर मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. इंगळे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीचे मानकरी स्वामी सेवक व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, रूपाली इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोळप्पा महाराजांचे वंशज प.पू.मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली व प.पू.मंदार महाराज पुजारी व मुग्धा पुजारी, मोहित महाराज पुजारी यांच्या हस्ते बदलापूरचे प्रसाद गुरुजी व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात हा दत्तयाग संपन्न झाला. दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते ८:३० या वेळेत गणपती कुलेष्ट देवता, वास्तू देवता, ग्रामदेवता आवाहन, सकाळी ८ : ३० ते ९ : ३० या वेळेत आचमन, प्राणायाम, मंगलाचरण, देवता गुरुवंदन शांतीपाठ, प्रायश्चित संकल्प, गोमाता पूजन, विष्णुपूजन, पंचगव्य प्राशन, यज्ञोपवित धारण, यथाशक्ती गोदान संकल्प, याग संकल्प, सकाळी ९ : ३० ते ११ या वेळेत गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, वसोर्धरा पूजन, नांदीश्राद्ध, सकाळी ११ ते ११ : ३० या वेळेत आचार्यादी, ऋत्वीज्वरण, ब्राह्मण पूजन,...