कॉ.नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनी ५१८ रक्तदात्यांनी केले रक्तदान!


प्रतिनिधी - सोलापूर   
सोलापूरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापकीय सदस्य, स्वातंत्र्यसैनिक कॉ.नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनीचे औचित्यसाधून दरवर्षी प्रमाणे यंदाही २६ जुलै रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे कार्यालय दत्त नगर येथे  माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख व अशोक इंदापुरे यांच्या हस्ते तर कॉ.गोदूताई परुळेकर नगर कुंभारी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व माजी नगरसेविका कॉ कामिनीताई आडम यांच्या हस्ते करण्यात आले.
 
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रे नगर चेअरमन कॉ.नलिनीताई कलबुर्गी, माजी नगरसेविका नसीमा शेख , व्यकंटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ शेख मेजर, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कुरमय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू,विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी,अँड.अनिल वासम,  हसन शेख, दाऊद शेख, नरेश दुगाणे लिंगवा सोलापूरे, शकुंतला पानिभाते, विरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, सनी शेट्टी,  आप्पाशा चांगले, रफिक काझी, मधुकर चिल्लाळ, अकील शेख, इलियास सिद्दीकी, दत्ता चव्हाण,बाळकृष्ण मल्याळ, नरेश गुल्लापल्ली,आसिफ पठाण, मल्लिकार्जुन बेलीयर, बालाजी गुंडे, मल्लेशम कारमपुरी, शाम आडम आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेतले. 
यावेळी सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय, इरय्या बोल्ली, सिद्धेश्वर ,सोलापूर आदी रक्तपेढी कडे एकूण ५१८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
या शिबिराचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर