प्रशांतकुमार पांडेय यांची रेल्वे प्रशासनाच्या वाराणसी येथे बदली-दुधनी शहर रिपाइं तर्फे सत्कार संपन्न.
प्रतिनिधी-अक्कलकोट
मध्य रेल्वे दुधनी येथे प्रबंधक म्हणून प्रशांतकुमार पांडेय हे गेल्या पाच वर्षा पासून कार्यरत होते.त्यांची अचानक मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने वाराणसी येथे बदली झाली आहे. त्यांचा निरोप समारंभचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी रिपाइं(आठवले गट)दुधनी शहर शाखेच्या वतीने शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी व जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या हस्ते प्रशांतकुमार पांडेय यांचा सत्कार करण्यात आला आहे.
दुधनी रेल्वे स्टेशन येथील दालनात प्रशांतकुमार पांडेय यांचा रिपब्लीकन पक्षाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच सोलापूर व कलबुर्गी विभागातील कर्मचारीही या प्रसंगी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मध्य रेल्वे चे सी एस् कुलकर्णी(T I),दुधनी स्टेशन अधिक्षक रामराज मीणा,स्टेशन प्रबंधक लिंगराज कांदे, बुकिंग सुप्रवायजर वेलु केशवन, E S Mसंदीप यादव,रिपाइं जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी यांनी प्रशांतकुमार पांडेय यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत प्रामाणीक व निष्ठेने काम करुन दुधनीकरांचे मन जिंकले असून त्याबद्दल प्रशांतकुमार पांडेय यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी दुधनी मध्यरेल्वेचे कुलकर्णी साहेब, रामराज कांदे, लक्कप्पा परमगोळ, वेलु केशवन, रिपाइं चे सैदप्पा झळकी,गोरखनाथ धोडमनी, महेदिमिंया जिडगे, विजयकुमार धोडमनी सह रेल्वे कर्मचारी शब्बीर पटेल, लक्कप्पा परमगोळ, इरण्णा ओग्गै,बिरप्पा पुजारी, सोमशंकर शिंगे, यल्लप्पा पुजारी, गौतम शिंगे आदि कर्मचारी सह विजयकुमार धोडमनी, एकनारथ मोसलगी,नागप्पा परमगोळ, ज्ञानेश्वर जाधव, सध्दाम शेख, मल्लीनाथ मदरी, शिवयोगी ठक्का,मिलींद मुळे, सिध्दाराम बिल्लाड,भिमा यड़्रामी, सिध्दाराम सावळगी,खाजप्पा लोड्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240