सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी मा.कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मा.मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती.




प्रतिनिधी - सोलापूर 
राज्य सरकारने तब्बल ४१(आयएएस)अधिकाऱ्यांच्या  बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली येथील मा.कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रं-२ मा.मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना पदभार स्वीकारून साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दिलीप स्वामी यांनाही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत.मा.दिलीप स्वामी आणि  मा.मिलिंद शंभरकर या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कोरोना काळात अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले आहे.
जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरकरांना बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.तर सीईओ दिलीप स्वामी यांना अजून पोस्टिंग दिलेली नाही.पुढील आठवड्यात सोलापूर जिल्ह्याला लाभलेले दोन्ही अधिकारी नव्या ठिकाणी रुजू होतील.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर