माजी नगरसेवक महेश साठे मित्र परिवाराच्या वतीने शाळेतील अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ व धान्य वाटप.
दि.२३ जुलै,२०२३ रोजी पंढरपूर येथील नवजीवन निवासी अपंग शाळेत माजी नगरसेवक मा. महेश साठे मित्र परिवाराच्या माध्यमातून मा.शिवकुमार जवळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वही,पेन,खाऊ वाटप तसेच धान्य वाटप करून एक सामाजिक बांधिलकीतून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळेस माजी नगरसेवक महेश साठे,लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव,देविदास कसबे, मा.आणासाहेब वादंडे ,दिनेश चव्हाण ,अशोक वायदंडे, दिनेश साठे, कृष्णा साठे, रोहित वायदंडे किरण आडगळे अक्षय सकट, दत्ता वायदंडे,दादा रणदिवे,विशाल कसबे तसेच जनता संघर्ष न्यूजचे पंढरपूर- प्रतिनिधी-जयसिंग मस्के यांच्या समवेत संस्थेचे कर्मचारी श्री.थोरात सर श्री.बोबडे सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गायकवाड सर यांनी केले तर आभार संस्थेचे शिक्षक श्री.आयरे सर यांनी मानले.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240