अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई सलग्नित श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय,अक्कलकोट संगीत विद्यालाच्या केंद्र संचालक पदी मयूर स्वामी यांची निवड.
प्रतिनिधी - अक्कलकोट
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई सलग्नित श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय,अक्कलकोट या संगीत विद्यालाचे केंद्र संचालक पदी मयूर स्वामी यांची निवड करण्यात आली असून सदर निवड अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय, क्कलकोट हे अक्कलकोट येथील सर्वात जुने व एकमेव संगीत केंद्र आहे. या विद्यालयातून अनेक विध्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.शास्त्रीय संगीताचे थोर उपासक संगीतालंकार कै.शरणप्पा कलबुर्गी हे या विद्यालयाचे संस्थापक व केंद्र संचालक म्हणून काम पाहत होते.त्यांच्या पश्चात हे पद मयूर स्वामी यांच्या कढे सोपवण्यात आली आहे.
या बद्दल शंकर लंगोटे, श्रीमती कुंदा नखाते, प्रभूलिंग कलबुर्गी, अशोक कडगंची, मल्लिनाथ स्वामी, वीरंणा कलबुर्गी, मनीषा करंदीकर, संतोष वगाले, चंद्रकांत डांगे, नागनाथ चव्हाण, अक्षय सरदेशमुख,ओंकार पाठक, आदित्य जोशी आणि महेश स्वामी आदींनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240