अधिक श्रावण मासानिमीत्त वटवृक्ष मंदिरात दत्तयागचे आयोजन-दि.२५ जुलै ते २७ जुलै अखेर संपन्न होणार दत्तयाग.


प्रतिनिधी - अक्कलकोट
यंदाचा श्रावण अधिक मास - व समाधानकारक पाऊस होण्याकरीता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ३ दिवसीय दत्त यागाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
दिनांक २५ जुलै ते दिनांक २७ जुलै २०२३ अखेर इंगळे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीचे मानकरी स्वामी सेवक व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चोळप्पा महाराजांचे वंशज प.पू.मोहनराव महाराज पुजारी, प.पू.मंदार महाराज पुजारी यांच्या अत्तधिपत्याखाली बदलापूरचे प्रसाद गुरुजी व ब्रह्मरुंदाच्या वतीने हे दत्तयाग संपन्न होईल.
या दत्तयाग सेवेत दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते ८ : ३० या वेळेत गणपती कुलेष्ट देवता, वास्तू देवता, ग्रामदेवता आवाहन, सकाळी ८ : ३० ते ९ : ३० या वेळेत आचमन, प्राणायाम, मंगलाचरण, देवता गुरुवंदन शांतीपाठ, प्रायश्चित संकल्प, गोमाता पूजन, विष्णुपूजन, पंचगव्य प्राशन, यज्ञोपवित धारण, यथाशक्ती गोदान संकल्प, याग संकल्प, सकाळी ९ : ३० ते ११ या वेळेत गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, वसोर्धरा पूजन, नांदीश्राद्ध, सकाळी ११ ते ११ : ३० या वेळेत आचार्यादी, ऋत्वीज्वरण, ब्राह्मण पूजन, दिग्रक्षण, मंडप शुद्धी, कुंड पूजन, सकाळी ११ : ३० ते २ : ३० या वेळेत अग्निमंथन, अग्नी स्थापना, वास्तू योगिनी, क्षेत्रपाल, दत्तभद्र, मंडल देवता स्थापन, देवता अभिषेक पूजन, दुपारी ४ ते ६ : ३० या वेळेत नवग्रहमंडल स्थापन, रुद्रकलश स्थापन, नवग्रह होम, सायंपूजन आरती इत्यादी विधी संपन्न होतील. 
दिनांक दि.२६ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ : ३० या वेळेत मंगलाचरण, शांतीपाठ, पीठमंडल, देवता प्रात पूजन, दत्तात्रेय स्वामी आवाहित देवता अभिषेक पूजन, पुजन अर्चन, ब्राम्हण पुजन, दुपारी ३ : ३० ते ६ : ३० या वेळेत नवग्रह हवन, प्रदान दत्तमाला मंत्र हवन, सायं पूजन, आरती इत्यादी विधी संपन्न होतील.
दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते दुपारी १ : ३० या वेळेत मंगलाचरण, शांतीपाठ, पीठमंडल, देवता प्रातः पूजन, दत्तात्रय स्वामी आवाहित देवता अभिषेक पूजन अर्चन, स्थापित देवता होम, उत्तरांग पूजन, दुपारी १२ : ३२ ते १२ : ५७ या वेळेत अभिजीत मुहूर्त, लाभ योग, आरती आशीर्वाद, ब्राह्मण पूजन, कर्म समापन, पूर्णाहुती इत्यादी विधी संपन्न होऊन हा दत्त याग सोहळा पूर्णत्वास जाईल. राज्यात व आपल्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस व्हावे याकरिता स्वामी चरणी या दत्त आयोगाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन  महेश इंगळे यांनी दिली.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०




Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर