श्री स्वामी समर्थ रुग्णालयात उद्या दि.२२जुलै,२०२३रोजी होमिओपॅथिक शिबिर.
प्रतिनिधी - अक्कलकोट
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर उद्या दिनांक दि.२२ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत संपन्न होणार आहे. देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात हा शिबीर संपन्न होईल. या शिबीरात मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर, मुकबधीर, शारिरीक व्यंग, मानसिक अधू इत्यादी विकारांवर २० वर्षाखालील मुला मुलींची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. या शिबिरात मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे तज्ञ संस्थापक डॉ.अंबरीश विजयकर, डॉ.प्रदीप विजयकर, डॉ.तन्मय विजयकर, डॉ.अपर्णा सामळ, डॉ.श्वेताली विजयकर, डॉ.क्षितिज जोशी, रजत मालोकर, अभिषेक पवार, आदी तज्ञ डॉक्टर्स रुग्णांना औषधोपचार तपासणी व मार्गदर्शन करतील तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.
-----------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240