दक्षिण सोलापूर कोतवाल भरती सन २०२३ आरक्षण सोडत.
प्रतिनिधी - सोलापूर
तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर येथे सन २०२३ मध्ये करण्यात येणाऱ्या कोतवाल भरती आरक्षण सोडत २० जुलै रोजी मनिषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर या ठिकाणी स.११-०० वा.संपन्न झाला. कोतवाल या पदासाठी मागासवर्गीय कक्ष,पूणे यांचे मंजूर बिंदुनामावलीनुसार ९ पदे रिक्त होते. शासन निर्णय नुसार ९ पदाच्या ८०% टक्के प्रमाणे एकूण ७ कोतवाल पदाची प्रवर्गनिहात आरक्षण सोडत काढण्यात आला.
यावेळी कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष मनीषा आव्हाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर क्रं.२, राजशेखर लिंबारे सदस्य सचिव तथा तहसिलदार दक्षिण सोलापूर, आर.बी.भंडारे निवासी नायब तहसिलदार,डि.एफ. गायकवाड,महसूल नायब तहसिलदार, विठ्ठल बी.जाधव निवडणूक नायब तहसिलदार, आरती दबाडे संजय गांधी नायब तहसिलदार,किरण फुले, परिविक्षाधीन नायब तहसिलदार, अव्वल कारकून पुरुषोत्तम शिंदे तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
अंतिम निश्चित झालेले आरक्षण सोडत खालील प्रमाणे
१)अनुसूचित जाती (महिला).- वळसंग
२) अनुसूचित जमाती - वडकबाळ
३) भटक्या जमाती (ब) - मुस्ती
४) भटक्या जमाती (ड)- हत्तुर
५) इतर मागास प्रवर्ग - बोरामणी
६) आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटक - तोगराळी
७) अनुसूचित जमाती (महिला)- सिंदखेड
-----------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240