इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना, एन.डी.एम.जे सामाजिक संघटनेकडून मदत.
प्रतिनिधी - पंढरपूर ,(जयसिंग मस्के)
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.या दुर्घटनेत मृतांचा आकडा गंभीर असून अनेक रहिवासी या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांचा शोध सुरु आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने,शोध कार्यात देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या, या दुर्घटनेतील कुटुंबाना जो पर्यंत शासनाकडून आर्थिक मदत व कायमचे पुनर्वसन होत नाही,तोपर्यंत आम्ही एन डी एम जे या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करू असे एन डी एम जे या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव मा. वैभव गिते यांनी सांगितले आहे.
या घटनेची माहिती मिळताच दुर्घटनेतील नातेवाईक व बाहेर काढलेल्या लोकांना, एन डि एम जे या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव मा. वैभव गिते ,अजिनाथ राऊत, आकाश चव्हाण, संभाजी साळे, प्रणव भागवत, स्वप्नील गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन, बाहेर काढलेल्या लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करून धीर दिला आहे.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240