अक्कलकोट तालुक्यातील गाव,वाड्या-वस्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने गाव भेट दौरा आयोजित करणार-बंदेनवाज कोरबू.

प्रतिनिधी -अक्कलकोट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आगामी नगरपालिका, महापालिका,नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत त्याअनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील गाव,वाड्या- वस्त्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने गाव भेट दौरा आयोजित करण्याचा संकल्प अक्कलकोट तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष बळीराम(काका)साठे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे पक्ष बळकटीकरणाचे काम करणार आहोत.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट तालुका विधानसभा अध्यक्ष बंदेनवाज कोरबू व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सौ.सुरेखा(ताई)पाटील यांनी दिली आहे. यावेळी जेष्ठ नेते मा.बळीराम(काका) साठे यांचा पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष स्वामीनाथ पोतदार,सेवादलाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास सिंदगीकर,हाजीमलंग कोरबू,नंदू भोसले,शहाबुद्दीन बेग,ओबीसी सेल महिला उपाध्यक्षा सरुबाई शिंदे,ओबीसी महिला शहराध्यक्षा गुरुदेव कानडे आदी उपस्थित होते.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर