Posts

Showing posts from January, 2025

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर

Image
प्रतिनिधी- सोलापूर सोलापूर महानगरपालिका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. पलोलू वाय. एच. हे कोरोना महामारी सुरु होण्या पुर्वीचे वैद्यकीय अधिकारी असुन त्यांनी कोरोना काळात तिन्ही लाटेत काम करून ही  त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील चुकीचे व असंबधीत कारणाने त्यांच्या वर अन्यायकारक कारवाई झाली असून त्यांची सर्व चौकशी पूर्ण झाली असून ते निर्दोष आहेत व सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे उच्चतम अधिकारी यांचे अभिप्राय व अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांचे कामकाज नियमानुसार झाल्या चे प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना म.न.पा आरोग्य विभाग मध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा. राहुल बोळकोटे यांच्या वतीने सोलापूर चे नूतन पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. 8 यावेळी पालकमंत्र्यांनी या विषयी निश्चित चौकशी करून न्याय देण्यात येईल व सेवेत सामावण्याचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.यावेळी या शिष्टमंडळात सुर्यकांत शिवशरण, व्ही. डी. गायकवाड, बळीराम ए...

जिल्हा परिषद प्रशालेत स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम संपन्न.

Image
मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेत स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षणाप्रसंगी प्रशिक्षक व सर्व कर्मचारी मुरूम, ता. उमरगा, ता.३१ (प्रतिनिधी) स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम २०२५ अंतर्गत जिल्हा परिषद प्रशालेत बुधवारी (ता.२९)  रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांना विविध नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी, गुड टच, बॅड टच व रहदारी नियम, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर कसा करावा याबाबतचे विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक एकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, हरिभाऊ माकणे, मोहन राठोड, क्रांती कांबळे, राजू पवार, अविनाश कवाळे, बाळू कांबळे नागनाथ कामशेट्टी, संगिता घुले आदींची उपस्थिती होती.    -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 ब...

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत विविध स्पर्धेतील स्पर्धकांना प्रशस्तीपत्राचे वाटप

Image
माधवराव पाटील महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत बक्षीस वितरण करताना मान्यवर व विजेते स्पर्धक. मुरूम, ता. उमरगा, (प्रतिनिधी)  श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत  बक्षीस वितरण कार्यक्रम मंगळवारी (ता. २८) रोजी पार पडला. या पंधरवड्यामध्ये महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामार्फत वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमाद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचन व लिखाणाची आवड निर्माण व्हावी म्हणून खुले ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी आवडेल त्या विद्यार्थ्यांना ग्रंथ व पुस्तके दिल्याने विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. राम बजगिरे, डॉ. सुजित मटकरी, डॉ.  सायबण्णा घोड...

शाक्य संघ, यश सिध्दी माजी सैनिक आणि दक्षिण सदर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानेशिक्षक हाऊसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन साजरा.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  शाक्य संघ, यश सिध्दी माजी सैनिक  आणि दक्षिण सदर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.२६ जानेवारी रोजी ७६ वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी, शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर व यशसिध्दी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक हौसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन बिगुल वाजवून मानवंदना देऊन साजरा केला. यावेळी "संविधानाचा विजय असो", "प्रजासत्ताक दिनाचा विजय असो", "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो", अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी शिक्षक हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन प्रदीप ताकपिरे, सदस्य अंबादास कदम, शेखर शिवशरण, सुर्यकांत डावरे, प्रभाकर भालेराव, मंजुषा ताकपेरे, आनंद कांबळे, अरुण साबळे, कांचनगंगा डावरे, शशिकला ओहोळ, आशा गायकवाड, यशसिध्दी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे, मधुकर माने, सुर्यकांत गजघाटे, कमलाकर कांबळ...

संभाजी राजे ग्रुपच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

Image
  मुरूम, ता.उमरगा (प्रतिनिधी)  शहरातील छत्रपती संभाजी राजे ग्रुप चे सचिन पाटील शिंदे पाटील यांच्यातर्फे शनिवारी (ता. २५) रोजी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमाला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटीच्या सदस्या डॉ.सुवर्णा पाटील होत्या.यावेळी मयुरी चौधरी,  रूपाली शिंदे, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे  सादरकते प्रसाद मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन उत्साहात कार्यक्रम पार पडला. संभाजी नगर येथे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करणारे सचिन शिंदे हे कौतुकास्पद कार्य करत असल्याचे यावेळी प्रसाद मोटे यांनी म्हटले. छत्रपती संभाजी राजे ग्रुपचे आकाश शिंदे, रतन मुडे, मोन्या राजपूत, बापू जाधव, सुमित शेळके, मल्लू तडकले, अक्षय शिंदे, सतीश मुदकन्ना, वैभव शिंदे, अभिजीत सूर्यवंशी, सुमित शिंदे, भैय्या धर्माधिकारी, सुमित पांढरे, सागर शिंदे, बंटी राजपूत, भरत घोडके, जिगर पवार, शिवराज गिरीबा, विकास शिंदे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्...

७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोगांव येथे सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण. (उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते दिव्यांगांना निधीचे वाटप)

Image
अक्कलकोट - प्रतिनीधी   ७६ प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोगांव येथे सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले  कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा. सदस्य लक्ष्मण बिराजदार हे होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शरणपा कलशेट्टी व अनिल मुलगे यांनी केले ध्वजकट्टाचे पुजन तंटा मुक्त समिती अध्यक्ष महादेव पाटील यांनी केले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जेष्ठ ग्रामपंचायत  सदस्य प्रदीप जगताप,ललिता कलशेट्टी  डॉ लिंगराज नडगेरी मुख्याध्यापक पूडलिक वाघमारे सूर्यकांत जिरगे, यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती,यावेळी विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली,आरोग्य विषयी माहिती देण्यात आली, कुष्ठरोगाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी सरपंच वनिता सुरवसे यांनी मार्गदर्शन केले व सरपंच वनिता सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते दिव्यांगाना चेक वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा  गोगांव येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत...

सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी.

Image
सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी. प्रतिनिधी-सोलापूर पी.एन. जी ज्वेलर्समध्ये चोरी करणारा, गुन्हेगार अटकेत, त्याचेकडून ७१.५ ग्रॅम सोने, १ किलो चांदी  असा ६,८७,०००/- (सहा लाख सत्त्याऐंशी हजार/-) रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत. दि. २३/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०७:३० वा. चे सुमारास पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, ध्रुव हॉटेल समोर, पटवर्धन चौक, सोलापूर या नव्याने सुरु झालेल्या, सुवर्णपेढी मध्ये काम करणारा सुपरवायझर, नामे राजकुमार बिराजदार याने सुवर्णपेढीतुन ७१.५ ग्रॅम सोने व एक किलो चांदी, असा एकुण ६,८७,०००/-रु. किंमतीचा ऐवज, पेढीमध्ये कोणालाही न सांगता, ग्राहकांची बनावट नावाने बुकिंग करुन, कंपनीची फसवणुक करुन, चोरुन नेले आहेत वगैरे मजकुराची फिर्याद, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे मॅनेंजर श्री. राहुल नरेश बाकळे यांनी दिली. सदर घटनेबाबत सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ६३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(४), ३०६ प्रमाणे दि. २४/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील विनोद रजपुत व उमेश पवार यांनी सदरचा गुन्हा करणारे इसमाबाबत, अत्यंत कमी ...

माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन.

Image
माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन. नाईक नगर, ता.उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत शिबिराप्रसंगी बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली काढताना प्रतापसिंग राजपूत अशोक बावगे, शिला स्वामी व स्वयंसेवक-स्वयंसेविका. मुरुम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी)  नाईक नगर ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी मंगळवारी (ता. २१) रोजी बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली काढण्यात आली. दुपारच्या सत्रातील व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागाचे प्रा. डॉ. रमेश आडे होते. याप्रसंगी मेरा युवा भारत या विषयावर हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. राजू शेख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी, डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा. भूषण पाताळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळच्या सत्रात अध्यक्षस्थानी प्राणीशास्...

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामुळे ग्रामविकासास हातभार लागतो-डॉ.वसंत गायकवाड.

Image
प्रतिनीधी- मुरुम   श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी विशेष शिबिर १५ जानेवारी पासून मौजे जकेकुरवाडी येथे सुरू होते. "युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी" ही थीम घेवून करण्यात आला होता.या शिबिराचा  समारोप दिनांक २१ जानेवारी रोजी  जेकेकुरवाडी गावामध्ये करण्यात आला सात दिवसाच्या विशेष शिबिरामध्ये वृक्ष संवर्धन, शोष खड्डे, ग्राम स्वच्छता, अंतर्गत गटारीची कामे बालविवाह निर्मूलन जनजागृती, शेतकऱ्यास मार्गदर्शन, ॲनेमिया तपासणी, ग्रामीण युवकासाठी उद्योजकीय संधी,विविध पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम या शिबिरादरम्यान घेण्यात आली होते. समारोप समारंभ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक , किरण बंडे, वैभव सूर्यवंशी, आपले मनोगत व्यक्त करून सात दिवसातील अनुभव त्यांनी सर्वांसमोर मांडला. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सिद्धू झंपले, रोहन कांबळे, पाचंगे अर्जुन प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या शिबिराच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून  डॉ वसंत गायकवाड सर यांनी विद्यार्थ्याने केलेल्या कामाचा कौतुक करून अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्...

अक्कलकोट संस्थानचे राजासाहेब श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

Image
अक्कलकोट संस्थानचे राजासाहेब श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. प्रतिनिधी - अक्कलकोट अक्कलकोटचे राजासाहेब श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व डॉ.हेडगेवार ब्लड बँक, सोलापूर यांच्या संयुक्त माध्यमातून दि.24 जानेवारी 2025 रोजी अक्कलकोट येथील नव्या राजवाड्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.गरजूंना जीवनदान देण्याची शक्ती रक्तदानामध्ये आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी 9 ते सायं 4 वाजेपर्यंत सुरू असेल.जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.   -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री. वसंतराव नाईक हायस्कूल सोलापूर येथे क्रीडा सप्ताहाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन.

Image
प्रतिनिधी - सोलापूर मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री. वसंतराव नाईक हायस्कूल सोलापूर येथे दि.21 /01 /2025 रोजी क्रीडा सप्ताहाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सुभाष (काका )चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.नरेंद्र पवार साहेब होते.  सदर कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक  म्हमाणे सर व परिवेक्षक श्री. सुरेश राठोड सर उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभ हस्ते संस्थापक श्री. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले प्रारंभी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत उत्साहाने आणली.  प्रमुख पाहुण्यांना विद्यार्थी गटानुसार मानवंदना देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पवार सर यांनी केले व क्रीडाशिक्षक श्री. देशमाने सर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी क्रीडा सप्ताहाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास सूत्रसंचालन श्री. कदम सर यांनी केले तर आभार श्री. लवटे ...

दिल्ली येथे होणाऱ्या '26 जानेवारी प्रजासत्ताक दिन'परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड.

Image
प्रतिनिधी-उमरगा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट वैभवी गोपाळ शेंडगे हिची दिल्ली येथे  होणाऱ्या 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या RDC संचलन परेडसाठी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या पंतप्रधान रॅलीसाठी ड्रिल मधुन तिची महाराष्ट्राच्या मुलीच्या संघात निवड झाली आहे .प्रत्येक वर्षी होणाऱ्या या संचलनासाठी देशातुन सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातुन एनसीसी कॅडेटस ड्रिल परेड इतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात . या साठी अनेक कठिन चाचण्या, परीक्षा पूर्ण करून ते कॅडेटस इथपर्यंत पोहचतात प्रत्येक कॅडेटसचे एनसीसी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर सर्वात मोठे उदिष्ठ , स्वप्न याच शिबीराचे असते रात्र -दिवस एक करून हे कॅडेटस याची तयारी करत असतात. हे शिबीर कॅडेटसचे भवितव्य ठरवणारे असते . मौजे कोरेगाववाडी ता .उमरगा जि . धाराशिव येथील छोट्याशा खेडगावातुन कठिन अशा परिस्थितीताला सामोरे जाऊन  एका गरीब शेतकऱ्याची मुलीने स्वतःच्या जिद्द ,आत्मविश्वास , कठोर परिश्रम घेऊन हे यश वैभवी शेंडगे या मुलीने पूर्ण करून दाखविले आहे हिचे कौतुक संपुर्ण धाराशिव जिल्हा,उमरगा तालुक्...

जीवनात अशक्य असे काहीच नाही;शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे

Image
लातूर येथील महालक्ष्मी हॉस्टेलमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांचा सत्कार करताना मैथिली कुमार व महिला भगिनी. लातूर, ता. लातूर, ता. २१ (प्रतिनिधी)  जीवन सुंदर आहे, ते प्रमाणिकपणाने जगत राहिलो तर गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे उमलत जाते. ते पूर्ण उमलल्यानंतर त्याची सुंदरता अधिक दिसते. परंतु खडतर जीवनाचा प्रवास पार केल्याशिवाय हे शक्य नाही. खरंतर जीवनात अशक्य असे काहीच नाही, असे प्रतिपादन लातूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी केले. लातूर येथील महालक्ष्मी गर्ल्स हॉस्टेल मध्ये आयोजित रविवारी (ता.१९) रोजी हळदी-कुंकू व नीट परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी गर्ल्स हॉस्टेलच्या संचालिका मैथिली कुमार होत्या. यावेळी जयश्री पवळे, कालिका चिखले, सुमित्रा पाटील, उषा कोराटे, ज्योती भोसले, हर्षदा मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सन १९९५-९६ ला परभणी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात शिकताना मी मेरा नाम जोकर मधील राजकपूरची ...

तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे- मदन पाटील.

Image
नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराप्रसंगी मदन पाटील बोलताना बापूराव पाटील, माणिक राठोड, गोविंद पाटील, व्यंकटराव जाधव, योगेश राठोड, अशोक सपाटे व अन्य. प्रतिनिधी - मुरुम, ता. उमरगा, देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी  ग्रामसफाई, पाण्याची बचत, पर्यावरणाचे संवर्धन, निती मूल्याचे शिक्षण, जातीय सलोखा, आरोग्य संवर्धन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही विशेष शिबिरे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे, तर मानसिक, सामाजिक, भावनिक विकास करून तरुणांना चांगले नागरिक बनण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात. राष्ट्र अभिमान जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झुकून द्यावे, असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी शनिवारी (ता. १८) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राठोड होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव ...

प्रजासत्ताक दिनी डॉ़.बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पूजा करण्यात यावे-सैदप्पा झळकी.

Image
  अक्कलकोट(प्रतिनिधी) दि.१७ प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पूजा करुन ध्वजारोहण करण्यात यावे अशी मागणी रिपाइं(आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष श्री सैदप्पा झळकी यांनी दुधनी चे प्रभारी मुख्याधिकारी श्री रमाकांत ढाके यांना निवेदनाद्वारे केली आहे.         मुख्याधिकारी ढाके यांच्या उपस्थित नसल्यांने दुधनी नगर परिषदेचे लेखापाल रोहीत जाधव यांच्या कडे निवेदन सुपूर्द करुन येत्या  २६जानेवरी या प्रजासत्ताक दिनी डॉ़.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमा ठेवून अभिवादन करुन ध्वजारोहण करण्याचे मागणी दुधनी रिपाइं च्या वतीने शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या उपस्थितीत देण्यात आली आहे.  या निवेदनाद्वारे कळविण्यात आले कि,दुधनी नगरपरिषद कार्यालया समोर दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.परंतु परमपूज्य संविधान निर्माते डॉ़.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पुजन करुन अभिवादन करण्यात येत नसल्याचे सांगून प्रजासत्ताक दिनी संविधान भारतात लागु केलेला दि...

मुरुम शहर कडकडीत बंद, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना - महात्मा बसवेश्वर अनुयायांनी मोर्चा काढत शहर बंद ठेवून केला निषेध व्यक्त.

Image
मुरुम शहर कडकडीत बंद, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना - महात्मा बसवेश्वर अनुयायांनी मोर्चा काढत शहर बंद ठेवून केला निषेध व्यक्त. मुरुम, ता. उमरगा, ता. १७ (प्रतिनिधी)  महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या भालकी येथील समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अज्ञातांकडून झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ सकल लिंगायत समाज बांधव व मुरूम शहरवासीयांच्या वतीने बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ मुरूम शहर कडकडीत बंद ठेवून निषेध शुक्रवारी (ता. १७) रोजी व्यक्त करण्यात आला. शहरातील विविध भागातून बसव अनुयायी, बसवप्रेमी तसेच शहरवासीय एकत्र येऊन शिवाजी चौकात महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा देत समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना अभिवादन करीत शहरातील  शिवाजी चौक येथून अक्कलकोट रोड मार्गे छत्रपती संभाजीनगर इथपर्यंत पुन्हा शिवाजी चौक इथून शहरातील मुख्य मार्गावरून महात्मा बसवेश्वर चौक, सिद्धरामेश्वर मठ, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे सोनार गल्ली, हनुमान चौक इथपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेतील अज्ञात आरोपींना तात...

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष सदस्यता नोंदणी अभियानास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट  अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानास स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीसाठी झोकून देऊन काम केले आहे. अक्कलकोटमध्ये भारतीय जनता पक्षाचे पक्ष संघटन वाढवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 250 नागरिकांना पक्षाचे सदस्यत्व दिले. उल्लेखनीय कामगिरी करणारे पक्षाचे कार्यकर्ते खालील प्रमाणे . अण्णाराव बाराचरे, नेताजी खंडाळगे, महेश हिंडोळे,सुरेश गड्डी, सुरेश नागुर, ॲड.दयानंद उंबरजे ,शंकर भांजी, शीलवंत छपेकर, सिद्धाराम हेले,प्रसन्न गवंडी,शंकर उनदे,कमलाकर सोनकांबळे, महादेव चराटे,विठ्ठल विजापुरे,राम हुक्केरी,रशिद खिस्तके, रजाक सय्यद, योगीराज हिरेमठ, परमेश्वर पाटील,जयशेखर पाटील, संतोष पोमाजी,कयुम पिरजादे, लक्ष्मण बुरुड,राहुल काळे. -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

डिग्गी विरभद्रेश्वर यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

Image
डिग्गी विरभद्रेश्वर यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न. प्रतिनिधी - उमरगा   तालुक्यातील डिग्गी येथील ग्रामदैवत विरभद्रेश्वर मंदिर यात्रा महोत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.१५) रोजी ग्रामदेवत विरभद्रेश्वर लग्न अक्षता सोहळा श्री ची भव्य मिरवणूक व अग्नीप्रवेश झाला. मंगळवारी (ता. १६) रोजी भव्य कुस्त्यांच्या फडाने यात्रेची सांगता झाली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले होते. तालुक्यातील डिग्गी गाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात वसले असून ग्रामदैवत विरभद्रेश्वर यात्रेनिमित्त मकर संक्रांतीनंतर दोन दिवस प्रतिवर्षी भव्य यात्रा भरते या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. मंगळवारी (ता १४) रोजी मकर संक्रांतीपासून यात्रा महोत्सवाला सुरूवात होते. बुधवारी सकाळी भद्रकाळी लग्नसोहळ्यानंतर दुपारी श्रीच्या पालखी आणि काठीच्या भव्य मिरवणूकीत गाव, परिसरातील हजारो भाविकांनी यावेळी अग्नीप्रवेश केला. सायंकाळी सहा वाजता मानाच्या रथाची मिरवणूकीने प्रदक्षिणा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करू...