७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोगांव येथे सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण. (उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते दिव्यांगांना निधीचे वाटप)



अक्कलकोट - प्रतिनीधी 
 ७६ प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोगांव येथे सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले  कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा. सदस्य लक्ष्मण बिराजदार हे होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शरणपा कलशेट्टी व अनिल मुलगे यांनी केले ध्वजकट्टाचे पुजन तंटा मुक्त समिती अध्यक्ष महादेव पाटील यांनी केले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जेष्ठ ग्रामपंचायत  सदस्य प्रदीप जगताप,ललिता कलशेट्टी  डॉ लिंगराज नडगेरी मुख्याध्यापक पूडलिक वाघमारे सूर्यकांत जिरगे, यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती,यावेळी विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली,आरोग्य विषयी माहिती देण्यात आली, कुष्ठरोगाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी सरपंच वनिता सुरवसे यांनी मार्गदर्शन केले व सरपंच वनिता सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते दिव्यांगाना चेक वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा  गोगांव येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे हे होते  .प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वनिता सुरवसे ग्रा. प. सदस्य लक्ष्मण बिराजदार, पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  सुधीर जगताप 
व सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रारंभी माजी सरपंच जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले   डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी प्रतिमा  पूजन डॉ. लिंगराज नडगेरी, सुधीर जगताप यांनी केले, ध्वजकट्टा पुजन  पंडित मुळजे यांच्या हस्ते करण्यात आले.
 शाळेची प्रगती व  कामकाज बद्दल  मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे  यांनी प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे भाषणे तथा विविध गुणदर्शन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व मुला-मुलींनी  सहभाग  नोंदवून देशभक्तीपर गीत, लोकगीत, अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सादर केली. यावेळी ग्रामपंचायत गोगांव व विविध सामाजिक संघटनेकडून विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,पुंडलिक वाघमारे,शंकर कारभारी,छाया भोसले,महादेव चव्हाण, ज्योती आलुरे,सुधीर जगताप, गंगाधर कोंडे, परमेश्वर गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री शंकर कारभारी यांनी केले.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर