मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री. वसंतराव नाईक हायस्कूल सोलापूर येथे क्रीडा सप्ताहाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन.
प्रतिनिधी-सोलापूर
मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री. वसंतराव नाईक हायस्कूल सोलापूर येथे दि.21 /01 /2025 रोजी क्रीडा सप्ताहाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सुभाष (काका )चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.नरेंद्र पवार साहेब होते.
सदर कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक म्हमाणे सर व परिवेक्षक श्री. सुरेश राठोड सर उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभ हस्ते संस्थापक श्री. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले प्रारंभी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत उत्साहाने आणली.
प्रमुख पाहुण्यांना विद्यार्थी गटानुसार मानवंदना देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पवार सर यांनी केले व क्रीडाशिक्षक श्री. देशमाने सर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी क्रीडा सप्ताहाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास सूत्रसंचालन श्री. कदम सर यांनी केले तर आभार श्री. लवटे सर यांनी मानले सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240