सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी.

प्रतिनिधी-सोलापूर
पी.एन. जी ज्वेलर्समध्ये चोरी करणारा, गुन्हेगार अटकेत, त्याचेकडून ७१.५ ग्रॅम सोने, १ किलो चांदी असा ६,८७,०००/- (सहा लाख सत्त्याऐंशी हजार/-) रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत.
दि. २३/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०७:३० वा. चे सुमारास पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, ध्रुव हॉटेल समोर, पटवर्धन चौक, सोलापूर या नव्याने सुरु झालेल्या, सुवर्णपेढी मध्ये काम करणारा सुपरवायझर, नामे राजकुमार बिराजदार याने सुवर्णपेढीतुन ७१.५ ग्रॅम सोने व एक किलो चांदी, असा एकुण ६,८७,०००/-रु. किंमतीचा ऐवज, पेढीमध्ये कोणालाही न सांगता, ग्राहकांची बनावट नावाने बुकिंग करुन, कंपनीची फसवणुक करुन, चोरुन नेले आहेत वगैरे मजकुराची फिर्याद, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे मॅनेंजर श्री. राहुल नरेश बाकळे यांनी दिली. सदर घटनेबाबत सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ६३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(४), ३०६ प्रमाणे दि. २४/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील विनोद रजपुत व उमेश पवार यांनी सदरचा गुन्हा करणारे इसमाबाबत, अत्यंत कमी कालावधीत, कौशल्याने, गोपनीयरित्या माहिती काढली. सुपरवायझर आरोपी नामे राजकुमार बापूराव बिराजदार वय-३५ वर्षे, रा. घर नं. १०८, हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, स्वामी विवेकानंद नगर, सोलापूर विमानतळासमोर, सोलापूर यास दि.२४/०१/२०२५ रोजीच सायंकाळचे सुमारास, तो चोरी केलेला ऐवज विक्री करण्यासाठी जात असताना, सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीत, त्याने पु. ना. गाडगीळ या दुकानातुन चोरलेले ७१.५ ग्रॅम सोने (एकुण १३ नग, पिळयाच्या अंगठया) व एक किलो चांदीचा बार (पी.एन.जी असा मार्क असलेले) असा एकुण ६,८७,०००/-रु. किंमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन १२ तासाचे आत उघडकीस आणला.तसेच सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय श्री. महेश विष्णुपंत कोठे यांचे निधन झाल्याने, दि.१५/०१/२०२५ रोजी त्यांचे पार्थिव शरिर अंत्यदर्शनासाठी संभाजीराव शिंदे प्रशाला, विडी घरकुल सोलापूर येथील शाळेतच्या मैदानात ठेवण्यात आले होते. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली होती. सदर गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणारे, दोन इसमांबाबत, सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील विनोद रजपुत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, सदर बातमी बाबत खात्री करुन, सपोनि शैलेश खेडकर व पथकाने दि. १७/०१/२०२५ रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे (१) महंमद इब्राहिम महंमद बागवान वय-२८ वर्षे, मुळ रा. बुनकर कॉलनी, बसवकलयाण, जि. बिदर, राज्य-कर्नाटक सध्या रा. मिसगोरी, नया मोहल्ला, मस्जिद जवळ, गुलबर्गा राज्य कर्नाटक (२) महंमद रफिक महंमद इस्माईल सय्यद वय-२८ वर्षे, मुळ रा. घर नं. २११, आळंद रोड, अशिया कॉलनी जाफराबाद, गुलबर्गा कर्नाटक सध्या रा. अलन चेक पोस्ट, आसरा क्वाटर्स, तोलाबाशा दर्गा, गुलबर्गा राज्य कर्नाटक या आंतरराज्यीय गुन्हेगारांना सापळा लावून ताब्यात घेतले. पथकास त्यांचे ताब्यात, त्यांनी गड्डा यात्रा मैदानाजवळील हरिभाई देवकरण प्रशालेचे मागील गेटजवळून चोरलेली एक मोटार सायकल देखील मिळून आली. सपोनि शैलेश खेडकर व पथकाने नमुद दोन आरोपींकडून, एक मोटार सायकल व दोन मोबाईल असा एकुण ५३,०००/- रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला व एम.आय.डी.सी पो.स्टे कडे दाखल असलेले मोबाईल चोरीचे दोन गुन्हे व सदर बझार पो. स्टे कडे दाखल असलेला मोटार सायकल चोरीचा एक गुन्हा असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तक्रादार नामे प्रभुलिंग राजेंद्र कदम वय-२५ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी रा. घर नं. ८०, होटगी रोड, सोलापूर यांची वापरती होंडा शाईन कंपनीची, गुब्बी टाईल्स, औदयोगिक वसाहत, होटगी रोड सोलापूर समोरील पाण्याचे टाकीखाली पार्क केलेली, मोटार सायकल, दि. १३/०१/२०२५ रोजी दुपारी १३:०० वा. ते १६:०० वा. चे दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली वगैरे फिर्यादीवरुन विजापूर नाका पो. स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं.२१/२०२५ भा.न्या. सं.२०२३ कलम ३०३(२) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील इम्रान जमादार यांनी तांत्रीक बाबींची पडताळणी करुन, सदर गुन्हयातील मोटार सायकल हस्तगत करुन, मोटार सायकल चोरीचा एक गुन्हा कौशल्याने उघडकीस आणला आहे.
दि. २६/०१/२०२५ रोजी सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील राजकुमार पवार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे देवराज जगप्पा जिरले, वय-२० वर्षे, व्यवसाय मजूरी सध्या रा. विले पार्ले, मुंबई मुळ रा. बनकनळी ता. शहापूर जि. गुलबर्गा, कर्नाटक यास त्याचे ताब्यातील दोन मोटार सायकलींसह ताब्यात घेवून तपास केला असता, त्याचेकडून दि. २६/०१/२०२५ रोजी दुपारचे वेळेस सोलापूर येथून चोरलेली मोटार सायकल व काही दिवसांपुर्वी गुलबर्गा येथून चोरलेली एक मोटार सायकल अशा दोन मोटार सायकली हस्तगत करुन (१) सदर बझार पो.स्टे गुन्हा रजि नं. ७४/२०२५ भा.न्या.सं.२०२३ कलम ३०३(२) व (२) चौक पो. स्टे गुलबर्गा गुन्हा रजि नं. ०६/२०२५ भा. न्या. सं.२०२३ कलम ३०३ (२) हे दोन मोटार सायकल चोरीचे गुन्हे कौशल्याने उघडकीस आणले आहेत.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240