मुरुम शहर कडकडीत बंद, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना - महात्मा बसवेश्वर अनुयायांनी मोर्चा काढत शहर बंद ठेवून केला निषेध व्यक्त.

मुरुम शहर कडकडीत बंद, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना - महात्मा बसवेश्वर अनुयायांनी मोर्चा काढत शहर बंद ठेवून केला निषेध व्यक्त.

मुरुम, ता. उमरगा, ता. १७ (प्रतिनिधी) 
महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या भालकी येथील समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अज्ञातांकडून झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ सकल लिंगायत समाज बांधव व मुरूम शहरवासीयांच्या वतीने बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ मुरूम शहर कडकडीत बंद ठेवून निषेध शुक्रवारी (ता. १७) रोजी व्यक्त करण्यात आला.शहरातील विविध भागातून बसव अनुयायी, बसवप्रेमी तसेच शहरवासीय एकत्र येऊन शिवाजी चौकात महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा देत समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना अभिवादन करीत शहरातील  शिवाजी चौक येथून अक्कलकोट रोड मार्गे छत्रपती संभाजीनगर इथपर्यंत पुन्हा शिवाजी चौक इथून शहरातील मुख्य मार्गावरून महात्मा बसवेश्वर चौक, सिद्धरामेश्वर मठ, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे सोनार गल्ली, हनुमान चौक इथपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेतील अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. या मागणीसाठी निषेधपर मोर्चा काढण्यात आला. यावेळी व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त बंद पाडून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवले होते. शहरात दिवसभर शुकशुकाट दिसून आला. यावेळी दत्ता हुलगुजगे, प्रदीप गव्हाणे, राजकुमार लामजाने, राजकुमार वाले, मेघराज लादे, गौरीशंकर बोंगरगे, शिवा दुर्गे, ओमकार पाटील, ओंकार कुंभार, संतोष स्वामी, गणेश वाकळे, ईश्वर कडगंचे, संदेश आडके, निनाद खेडे यांच्यासह लिंगायत समाज बांधव व मुरूम शहर वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर