प्रजासत्ताक दिनी डॉ़.बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पूजा करण्यात यावे-सैदप्पा झळकी.

 

अक्कलकोट(प्रतिनिधी) दि.१७
प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पूजा करुन ध्वजारोहण करण्यात यावे अशी मागणी रिपाइं(आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष श्री सैदप्पा झळकी यांनी दुधनी चे प्रभारी मुख्याधिकारी श्री रमाकांत ढाके यांना निवेदनाद्वारे केली आहे. 
       मुख्याधिकारी ढाके यांच्या उपस्थित नसल्यांने
दुधनी नगर परिषदेचे लेखापाल रोहीत जाधव यांच्या कडे निवेदन सुपूर्द करुन येत्या  २६जानेवरी या प्रजासत्ताक दिनी डॉ़.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमा ठेवून अभिवादन करुन ध्वजारोहण करण्याचे मागणी दुधनी रिपाइं च्या वतीने शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या उपस्थितीत देण्यात आली आहे. 

या निवेदनाद्वारे कळविण्यात आले कि,दुधनी नगरपरिषद कार्यालया समोर दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.परंतु परमपूज्य संविधान निर्माते डॉ़.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पुजन करुन अभिवादन करण्यात येत नसल्याचे सांगून प्रजासत्ताक दिनी संविधान भारतात लागु केलेला दिवस असून त्या संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर आहे.म्हणून साऱ्या देशात बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतात. म्हणून आपणही या वर्षी जातीने लक्ष घालून  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून अभिवादन करण्यात यावे.अन्यता संबंधीत अधिकाऱ्यांकडे कायदेशीर कार्यवाइसाठी रिपाइं कडून आंदोलन छेडण्यात येइल अशा इशारा रिपाइं ने केली आहे.
या प्रति मा.जिल्हाधिकारी सोलापूर,मा.जिल्हा प्रशासन अधिकारी सोलापूर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.डॉ़.रामदासजी आठवले भारत सरकार यांच्या कडे केली आहे. सदर निवेदनावर रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,मुस्लिम आघाडी शहर अध्यक्ष महेदिमिया जिडगे, संतोष जन्ना,सैदप्पा जन्ना यांच्या  सह्या आहे.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर