सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर
प्रतिनिधी- सोलापूर
सोलापूर महानगरपालिका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. पलोलू वाय. एच. हे कोरोना महामारी सुरु होण्या पुर्वीचे वैद्यकीय अधिकारी असुन त्यांनी कोरोना काळात तिन्ही लाटेत काम करून ही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील चुकीचे व असंबधीत कारणाने त्यांच्या वर अन्यायकारक कारवाई झाली असून त्यांची सर्व चौकशी पूर्ण झाली असून ते निर्दोष आहेत व सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे उच्चतम अधिकारी यांचे अभिप्राय व अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांचे कामकाज नियमानुसार झाल्या चे प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना म.न.पा आरोग्य विभाग मध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा. राहुल बोळकोटे यांच्या वतीने सोलापूर चे नूतन पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेबांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पालकमंत्र्यांनी या विषयी निश्चित चौकशी करून न्याय देण्यात येईल व सेवेत सामावण्याचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.यावेळी या शिष्टमंडळात सुर्यकांत शिवशरण, व्ही. डी. गायकवाड, बळीराम एडके, प्रमोद भवाळ उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240