डिग्गी विरभद्रेश्वर यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

डिग्गी विरभद्रेश्वर यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न.


प्रतिनिधी-उमरगा 
तालुक्यातील डिग्गी येथील ग्रामदैवत विरभद्रेश्वर मंदिर यात्रा महोत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.१५) रोजी ग्रामदेवत विरभद्रेश्वर लग्न अक्षता सोहळा श्री ची भव्य मिरवणूक व अग्नीप्रवेश झाला. मंगळवारी (ता. १६) रोजी भव्य कुस्त्यांच्या फडाने यात्रेची सांगता झाली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले होते.
तालुक्यातील डिग्गी गाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात वसले असून ग्रामदैवत विरभद्रेश्वर यात्रेनिमित्त मकर संक्रांतीनंतर दोन दिवस प्रतिवर्षी भव्य यात्रा भरते या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. मंगळवारी (ता १४) रोजी मकर संक्रांतीपासून यात्रा महोत्सवाला सुरूवात होते. बुधवारी सकाळी भद्रकाळी लग्नसोहळ्यानंतर दुपारी श्रीच्या पालखी आणि काठीच्या भव्य मिरवणूकीत गाव, परिसरातील हजारो भाविकांनी यावेळी अग्नीप्रवेश केला. सायंकाळी सहा वाजता मानाच्या रथाची मिरवणूकीने प्रदक्षिणा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुवारी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा फड रंगला व यात्रेची सांगता झाली. 
वीरभद्रेश्वर हे भगवान शंकराच्या उग्र अवातरापैकी एक असल्याचे अनेक उल्लेख शिवमहापुराणात सापडतात. भगवान शंकर हे अतिप्राचीन दैवत, याची नावे व रूपेही अनेक आहेत. जगाच्या अनेक भागात महादेवाचे अस्तित्व अनेक ठिकाणी सापडते. शिवपुराणातील कथेनुसार दक्ष प्रजापतीच्या यज्ञात माता सतीने उडी टाकली हे कळताच क्रोधित झालेल्या महादेवाने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या तेव्हा त्यातून वीरभद्रेश्वराचा अवतार झाला. त्याने दक्षाचा वध केला अशी कथा आहे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञात वीरभद्रेश्वराने मोठा पराक्रम गाजविला. वीरभद्रेश्वराची देशात .अनेक मंदिरे आहेत.
यात्रा उत्सवामध्ये धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेत बाळ गोपाळांसाठी अनेक खेळण्या आल्या होत्या. यात्रेनिमीत्त मोठा बाजारपेठ सजला होतो. अनेक महीला त्यांच्या साहीत्याची खरेदी करीत होते.
उमरगा-लोहारा तालुक्याचे नुतन आमदार तथा डिग्गी गावचे भुमीपुत्र प्रविण स्वामी यांच्यासह मंदीर समितीचे अध्यक्ष सिध्दाराम कवठे, यात्रा कमीटीचे अध्यक्ष युवराज कर्पे, सरपंच आशाताई लिंबारे, उपसरपंच संतोष कवठे, वामन गायकवाड, सुनील बालकुंदे, रविंद्र गायकवाड, दयानंद स्वामी,  पुणेकर ग्रुपचे अध्यक्ष सचिन हेबळ, उपाध्यक्ष विरेंद्र पाटील, दिनकर गायकवाड, मधुकर गायकवाड,  विनोद गायकवाड, सामाजीक कार्यकर्ते गुरुनाथ मंठाळे, अप्पाराव पाटील, राहुल कवठे, सिध्दाराम पाटील, शिवकुमार स्वामी,  शिवानंद पाटील, डॉ. प्रदीप शिंदे, बालाजी पाटील, नागनाथ तडकले, शांतप्पा कवठे, राजु कुलकर्णी आदींनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

 


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर