माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन.

माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन.
नाईक नगर, ता.उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत शिबिराप्रसंगी बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली काढताना प्रतापसिंग राजपूत अशोक बावगे, शिला स्वामी व स्वयंसेवक-स्वयंसेविका.


मुरुम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी) 
नाईक नगर ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी मंगळवारी (ता. २१) रोजी बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली काढण्यात आली. दुपारच्या सत्रातील व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागाचे प्रा. डॉ. रमेश आडे होते. याप्रसंगी मेरा युवा भारत या विषयावर हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. राजू शेख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी, डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा. भूषण पाताळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळच्या सत्रात अध्यक्षस्थानी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत होते. याप्रसंगी व्यसनमुक्ती :  युवकांची भूमिका या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. दयानंद बिराजदार, प्रा. दिनकर बिराजदार, प्रा. दिलीप वाघमारे, प्रा. शिवकुमार मठपती, दिलीप घाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत बालविवाह प्रतिबंध जनजागृती रॅली घरोघर पोचविण्यात आली. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिला स्वामी तर आभार प्रा.अशोक बावगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक-स्वयंसेविका यांनी पुढाकार घेतला. 
 --------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर