शाक्य संघ, यश सिध्दी माजी सैनिक आणि दक्षिण सदर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानेशिक्षक हाऊसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन साजरा.
प्रतिनिधी-सोलापूर
शाक्य संघ, यश सिध्दी माजी सैनिक आणि दक्षिण सदर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.२६ जानेवारी रोजी ७६ वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी, शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर व यशसिध्दी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक हौसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन बिगुल वाजवून मानवंदना देऊन साजरा केला. यावेळी "संविधानाचा विजय असो", "प्रजासत्ताक दिनाचा विजय असो", "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो", अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी शिक्षक हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन प्रदीप ताकपिरे, सदस्य अंबादास कदम, शेखर शिवशरण, सुर्यकांत डावरे, प्रभाकर भालेराव, मंजुषा ताकपेरे, आनंद कांबळे, अरुण साबळे, कांचनगंगा डावरे, शशिकला ओहोळ, आशा गायकवाड, यशसिध्दी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे, मधुकर माने, सुर्यकांत गजघाटे, कमलाकर कांबळे आणि शाक्य संघाचे अध्यक्ष डॉ.अंगद मुके, अशोककुमार दिलपाक, शांताराम वाघमारे, नागेश गायकवाड, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे करुणा सीतासावद, शशिकांत बाबरे,कैलास गायकवाड यांच्यासह शाक्य संघाचे बौध्द उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240