जिल्हा परिषद प्रशालेत स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम संपन्न.

मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेत स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षणाप्रसंगी प्रशिक्षक व सर्व कर्मचारी


मुरूम, ता. उमरगा, ता.३१ (प्रतिनिधी)
स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम २०२५ अंतर्गत जिल्हा परिषद प्रशालेत बुधवारी (ता.२९)  रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांना विविध नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी, गुड टच, बॅड टच व रहदारी नियम, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर कसा करावा याबाबतचे विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक एकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, हरिभाऊ माकणे, मोहन राठोड, क्रांती कांबळे, राजू पवार, अविनाश कवाळे, बाळू कांबळे नागनाथ कामशेट्टी, संगिता घुले आदींची उपस्थिती होती.
  --------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
               


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर