साहित्यरत्न,लोकशाहीरअण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी)च्या स्थापने साठी ३०५ कोटी रुपयाच्या आराखड्याला मिळाली मंजूरी.

साहित्यरत्न,लोकशाहीरअण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी)च्या स्थापने साठी ३०५ कोटी रुपयाच्या आराखड्याला मिळाली मंजूरी. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,सोलापूर गेले दहा वर्षापासून मातंग समाजातील विविध संघटनांकडून तसेच क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या धर्तीवर आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी) च्या स्थापनेसाठी आंदोलने, मोर्चे, धरणे, साखळी उपोषणे, पदयात्रा या स्वरूपाची तीव्र आंदोलने करून तत्कालीन राज्य सरकारांची लक्ष वेधण्यात आले होते.हजारो निवेदने सरकारला दिली गेली होती. समाजातील विविध स्तरातून केले गेलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्टिच्या स्थापनेची घोषणा केली होती. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संस्थेला मूर्त स्वरूप येण्यासाठी मुंबई येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ...