हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात २१ जून रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत योग दिन साजरा होणार २० जून रोजी जनजागृती’ रॅलीचे आयोजन.

हरीभाई देवकरण  प्रशालेच्या प्रांगणात २१ जून रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत योग दिन साजरा होणार २० जून रोजी जनजागृती’ रॅलीचे आयोजन.




प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सोलापुरकरानी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी योग दिवस समन्वय समितीच्या बैठकीत केले. 


      केंद्रिय संचार ब्यूरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, योग दिवस समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन, सोलापूर यांच्या वतीने दिनांक २१ जून रोजी साजरा होणा-या १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्रीमती कुंभार बोलत होत्या.
     यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितिन धार्मिक, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, विभागीय सहसंचालक डॉ नलिनी टेंबेकर, तहसिलदार समीर यादव, पोलीस आयुक्तालयाचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, ग्रामीण पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक भारत सावंत, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, योग समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
      निवासी उपजिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सर्व शासकीय शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २१ जून रोजीच्या योग दिनात सक्रिय सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणावर सोपवण्यात आलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेवून पार पाडावी. तालुकास्तरावर ही योग दिन साजरा करण्याबाबत संबंधित सर्व तहसीलदार यांना सुचित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
       जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयापासून ते संत जनाबाई भाजी मार्केट, चैतन्य नगर पर्यंत २० जून रोजी योग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. दिनांक २१ जून हा आंतरराष्‍ट्रीय योग दिन म्‍हणून जागतिक स्‍तरावर मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी देशभर माघील १०० दिवसापासून ‘योग महोत्सव’ साजरा करण्‍यात येत आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने भारत सरकारची सर्व मंत्रालयाने उत्‍सफुर्तपणे सहभाग घेउन रोज ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ प्रमाणे सराव करत आहेत, अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली.
       स्वत: व समाजासाठी योग ही यावर्षीची संकल्पना आहे. यावर्षीचा हा दहावा आंतरराष्‍ट्रीय योग दिन हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर दि. २१ जून २०२४ रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत साजरा करण्यात येणार आहे. केंद्रिय संचार ब्युरोच्या वतीने दिनांक २० ते २१ जून पर्यंत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये आयुष मंत्रालयाद्वारे निर्देशित केलेल्या ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ आणि भारतीय योग शास्त्र या विषयांवर मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये भारतीय योग, विविध योगासने, प्राणायम, ध्यान याविषयी माहिती देणारे चित्र व मजकुरासह लोकांना बघता येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती श्री चव्हाण यांनी देऊन सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व योग संस्था यांनी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती बैठकीत दिली.
    या बैठकीसाठी एन सी सी ९ व ३८ बटालियनचे नायब सुभेदार बंडू गळवे, तालुका क्रीड अधिकारी सत्येन जाधव, नेहरू युवा केंद्र संघटनचे अजित कुमार, जिल्हा परिषदचे एन डी धोत्रे, योग साधना मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापुरे, भारतीय योग संस्थानचे डी पी चिवडशेट्टी, बी एन पाटील, पतंजली योग पिठाच्या सुजाता सुतार, रघुनंदन भुतडा, सुरेंद्र पिसे, योग सेवा मंडळाचे सचिव जितेंद्र महामुनी, योग असोसिएशनचे उपाधाय्क्ष दत्तात्रय वेदपाठक, महाराष्ट्र राज्य भारत स्कॉउट गाईड कार्यालयाच्या जिल्हा संघटक अनुसया सिरसाट, हरिभाई देवकरण प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे आणि केंद्रीय संचार ब्युरोचे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे इत्यादी उपस्थित होते.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर