प्रोजेक्ट निदान अंतर्गत ति-हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबीराचे आयोजन.
प्रोजेक्ट निदान अंतर्गत ति-हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबीराचे आयोजन.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी प्रोजेक्ट निदान ही मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 30 वर्षे वयावरील सर्व महिलांची तपासणी केली जात आहे. कर्करोगाचे वेळेवर निदान झाले तर रूग्णावर उपचार होवून त्याचा जीव वाचू शकतो.
सद्यस्थितीत कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व वेळेवर निदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या आजाराचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे.लवकर निदान करा,जीवन वाचवा हे घोषवाक्य घेऊन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सर्व उपचार मोफत होणार आहेत.
आज उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत निकम हॉस्पिटल येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 287 महिलांची तपासणी करण्यात आली. शिबीराचे उद्घाटन ति-हे सरपंच गोवर्धन जगताप यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी गावच्या उपसरपंच मंगल सोनटक्के, डॉ. अमोल निकम, डॉ. योगीता निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रितम मुंदडा,डॉ श्रीशैल नाईकवाडी हे प्रमुख उपस्थितीत होते.
या शिबीरात स्तनाच्या कर्करोगाची तपासणी डॉ. शुभांगी शिंदे व डॉ. सोनाली देशमुख समुदाय आरोग्य अधिकारी आंधळगांव यांनी केली. यावेळी डॉ. प्राजक्ता शेटे, प्रिती महांकाळे, अमृता ढवळे समुदाय आरोग्य अधिकारी, एस. जी. अरकेरी, के. आर. जाधव आरोग्य सहाय्यक, जोशी आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका गोगी, शिंगण, वाघमारे, जाधव, वडे, राजमाने, आरोग्य सेवक पाटील एस. आर, कटके जे. जे. पाटील आर.आर व कत्ते समुह संघटक यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240