श्रीशैल गवंडी यांनी घेतले सहकुटूंब पंढरीच्या विठूमाऊलीचे दर्शन.
श्रीशैल गवंडी यांनी घेतले सहकुटूंब पंढरीच्या विठूमाऊलीचे दर्शन.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,पंढरपूर
अक्कलकोटच्या श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य कार्यशील व्यवस्थापक श्रीशैल गवंडी यांनी नुकतेच सहकुटूंब येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस भेट देऊन विठू माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी श्रीशैल गवंडी व कुटुंबीयांचा पंढरीतील विठू माऊलीच्या गाभाऱ्यात व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यालयात श्री विठ्ठलाचे कृपाप्रसाद गवंडी यांच्या स्वाधीन करुन गवंडी कुटूंबियांचा सन्मान केला. प्रसंगी पुरोहीत केशव उत्पात, गणेश राजपुरे, बबनराव राजपुरे आदींसह गवंडी कुटूंबीय उपस्थित होते.
----------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240