जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नव प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,अक्कलकोट
जीवनाच्या सोबतीला अनेक नवनवीन मित्रांचा सहवास जिथून लाभतो ते ठिकाण म्हणजे शाळा.भाषेचे ज्ञान आणि अक्षराची
ओळख,वाचनाची गोडी अन लिखाणाची सवय लावते.
ती वास्तू म्हणजे शाळा.शिक्षक रुपी गुरु आणि ज्ञानरुपी अमृत
अक्षररूपी सोनं आणि विचाररुपी मोती देणारं ठिकाण म्हणजे शाळा.
दि. १५/०६/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिलीचा प्रवेश उत्सव तसेच विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गाडीवर बसून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प, विदूषक टोप्या घालत हे क्षण कॅमेऱ्यातून टिपण्यात आले.
विविध नावीन्यपूर्ण खेळांच्या माध्यमातून, विविध शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक विकास करण्याचा प्रयत्न शाळेच्या वतीने करण्यात आला.विद्यार्थ्यांनी देखील आपले कौशल्य याप्रसंगी दाखविले. शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मल्लिनाथ चनपटणे सर, हाजराबी बागवान मॅडम,संध्या बशेट्टी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप सदर प्रसंगी करण्यात आले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक यलप्पा पुटगे सर,दिनकर भारती,पालक वर्गातून प्रीती झिंगाडे यांनी आपले मनोगत सदर प्रसंगी व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांनी मार्गदर्शन करते प्रसंगी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शाळेच्या सर्वागीण विकासासाठी सर्व जण प्रयत्न करतील अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
सदर कार्यक्रम विद्यार्थी,पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दौलप्पा म्हेत्रे,अंगणवाडी सेविका आणि शाळेचे शिक्षक यल्लप्पा पुटगे, हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे,हाजराबी बागवान,संध्या बशेट्टी,दिनकर भारती यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240