साहित्यरत्न,लोकशाहीरअण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी)च्या स्थापने साठी ३०५ कोटी रुपयाच्या आराखड्याला मिळाली मंजूरी.

साहित्यरत्न,लोकशाहीरअण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी)च्या स्थापने साठी ३०५ कोटी रुपयाच्या आराखड्याला मिळाली  मंजूरी.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
        गेले दहा वर्षापासून मातंग समाजातील विविध संघटनांकडून तसेच क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था  (बार्टी) च्या धर्तीवर  आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे  (आर्टी) च्या स्थापनेसाठी आंदोलने, मोर्चे, धरणे,  साखळी उपोषणे, पदयात्रा या स्वरूपाची तीव्र आंदोलने करून तत्कालीन राज्य सरकारांची लक्ष वेधण्यात आले  होते.हजारो निवेदने सरकारला दिली गेली होती. समाजातील विविध स्तरातून केले गेलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्टिच्या स्थापनेची घोषणा केली होती. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  या संस्थेला मूर्त स्वरूप येण्यासाठी मुंबई येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या इमारत उभारणीसाठी ३०५ कोटीच्या रुपयाच्या  आराखड्याला मंजुरी दिली आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देखील महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्याचा ठराव  नुकताच करण्यात आला.
क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाज यांच्या मागणीला मिळाले यश.  
    अधिक माहिती देताना क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांनी सांगितले की,आर्टीच्या स्थापनेमुळे मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होणे शक्य झाले आहे.या संस्थेच्या वतीने भविष्यात अनेक समाज उपयोगी प्रकल्प राबविले जातील.त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षांची तयारी साठी  मार्गदर्शन केंद्रे आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासारखे प्रकल्पांच्या माध्यमातून मातंग व तत्सम जातीतील  युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम केले जाईल.बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यातील  नोकऱ्यांमध्ये मातंग व तत्सम जातीचे घटलेले प्रमाण भविष्यात वाढण्यास आर्टि या संस्थेच्या स्थापनेमुळे मदत होईल.'
    यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे व सकल मातंग समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर