आशांचा सन्मान म्हणजे मातृत्वाचाच सन्मान-संतोष पवार
आशांचा सन्मान म्हणजे मातृत्वाचाच सन्मान-संतोष पवार
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,भंडारकवठे
आरोग्य विभागात तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि बचत गटातील महिलांचा सन्मान म्हणजेच एक प्रकारे मातृत्वाचा सन्मान असल्याचे प्रतिपादन मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी केले.

![]() |
मार्ग फौंडेशनकडून आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, बचत गटातील महिलांचा सत्कार करतांना संस्थापक अध्यक्ष संतोष पवार |
तसेच साडी, बॅग आणि प्रमाणपत्र देऊन या महिलांचा सन्मान करण्यात आला.तीस महिलांना दिले मोफत बुटी पार्लरचे प्रशिक्षण...
यशस्वीतेसाठी समन्वयक संतोष राठोड, अमोल कांबळे, संतोष गायकवाड, अजय चव्हाण, अनिल पवार आणि सर्व शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते इ नी प्रयत्न केले.
यावेळी मार्गचे पवार म्हणाले की,कोव्हिड सारख्या महामारीच्या काळात आशा वर्कर महिलांनी समाजाला वाचवण्याचा मोठ काम केलेला आहे.घरोघरी जावून प्रत्येक नागरिकांचे काळजी त्यांनी घेतलेला आहे.तसेच ग्रामीण असो वा शहरी भागातील सामान्य कुटूंबातील लहान मुलांना चांगल वळण लागावेत यासाठी अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस यांचे मोठ योगदान आहे. बचतीच सवय लागून त्यातून नवीन उद्योग व्यवसाय देखील महिलांनी उभारलेला आहे. म्हणून मार्गकडून या मातृत्वाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. समाजातील या अति महत्वाचे घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले. ब्युटी पार्लर सारख्या व्यवसायात महिलांना उभारी घेता येऊ शकतो.
मिटकाॅनचे चंद्रकांत लोंढे म्हणाले की,महिलांनी स्वतंत्र व्यवसाय उभारून उद्योजक व्हावे. आणि आर्थिक सहकार्यासाठी मिटकाॅनसह मार्ग फौंडेशन तुमच्या सोबत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मार्ग फाउंडेशनच्या वतीने एक महिन्याचा मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आला होता.यातील महिला प्रशिक्षणार्थी महिला प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240