महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गोगांव सरपंच वनिता सुरवसे यांच्या वाढदिवासानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप..
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गोगांव सरपंच वनिता सुरवसे यांच्या वाढदिवासानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या सोलापूर जिल्हा समन्वयक तथा गोगांवचे सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या वाढदिवासानिमित्त अभिनव उपक्रम राबवण्यात येणार असून ग्रामपंचायत कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज मोफत भरण्यात येणार असल्याचे माहिती उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या वाढदिवासानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी सर्व मुला मुलींना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की सरपंच महिला असून ही गोगांव गावाच्या विकासकामासाठी सतत प्रयत्नशील आहेत गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे प्रगती पथावर आहेत सरपंच यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गावामध्ये १०१ वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई व सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्व मुला मुलींना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ग्रामसेवक विक्रम घाटे, नागेंद्र आलूरे, किरण गायकवाड , मुख्याध्यापक दयानंद चोळे, पूडलिक वाघमारे, शंकर कारभारी, दत्ता गायकवाड, ज्योती आलूरे महादेव चव्हाण, किरण गायकवाड, नामदेव बनसोडे, आनंद बनसोडे आदी उपस्थित होते.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240