सागर सिमेंट व एम के फाऊंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत 2 लाख वह्या होणार वाटप.

सागर सिमेंट व एम के फाऊंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत 2 लाख वह्या होणार वाटप.



प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
दि.२०जून,२०२४ रोजी,कर्मयोगी अप्पासाहेब कादादी सांस्कृतिक भवन,साखर कारखान्या जवळ होटगी रोड,सोलापूर येथे दुपारी १२:३०वा.खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थांना वह्याचे वाटप करणयात येणार आहे.सदर कार्यक्रमास श्री.ब्र. श्री.शिवपुत्र महास्वामीजी,वेदमूर्ती महांतेश हिरेमठ,धर्मराज काडादी,दत्तात्रय मुळे,आनंद लोणावत(सागर सिमेंट सेल्स प्रमोटर)यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत उपस्थिती रहावे.असे आवाहन एम के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट महाराष्ट्र राज्य मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले आहे.
श्री.महादेव कोगनुरे
एम.के.फाऊंडेशन-संस्थापक अध्यक्ष 
 सागर सिमेंट-महाराष्ट्र राज्य,मुख्य व्यवस्थापक  
एम के फाऊंडेशन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे फाऊंडेशन म्हणून सर्वांना परिचित आहे.केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणे एवढेच या संस्थेचे कार्य नाही,तर या फाऊंडेशनचे काम सर्वस्वी आगळेवेगळे आहे. एम के फाऊंडेशनच्या नेमके उद्दिष्ट दक्षिण सोलापूर भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एम के फाऊंडेशनच्या सामाजिक संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम अर्थात वह्या वाटप करण्यात येणार आहेत अशी माहिती महादेव कोगनुरे यांनी दिली आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर