शरण जिरगे यांनी जपला वृक्षसंवर्धनाचा वसा;भूमिपुत्राने दिले गोगांव गावास विविध प्रकारचे(रोपे),झाडे भेट.
शरण जिरगे यांनी जपला वृक्षसंवर्धनाचा वसा;भूमिपुत्राने दिले गोगांव गावास विविध प्रकारचे(रोपे),झाडे भेट.
मुळचे गोगांव ता. अक्कलकोट येथील रहिवाशी सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले शरण तीपणा जिरगे यांची गावाकडे आसलेली ओढ,प्रेम,आपुलकी निमित्त ज्या गावात आपले बालपण गेले त्या गावचे काहीतरी देणं लागतो या विचाराने प्रेरित होऊन यंदाच्या यात्रेच्या वेळी उन्हात लागलेले चटके याची जाणीव ठेवून यात्रेच्या वेळी वर्ग मित्र उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांना दिलेले शब्द पाळत गावामध्ये विविध प्रकारचे १०१ झाडे ग्रामपंचायतीस भेट दिली आहे.
सदरच्या या पर्यावरण पूरक स्तुत्य कार्याचे गावासह परिसरात कौतुक होत आहे.विविध प्रकारचे झाडे हे आरोग्य उपकेंद्र , जिल्हा परिषद शाळा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, शाळेपासून गावापर्यंत झाडे लावण्यात आले.
यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, डॉ लिंगराज नडगेरी, आरोग्यसेविका अंबिका वळसंग, ग्रा. प. सदस्य शरणपा कलशेट्टी, मुख्याध्याक दयानंद चोळे, पुंडलिक वाघमारे, शंकर कारभारी किरण गायकवाड, काही झाडे गावकऱ्यांना लावण्यासाठी देण्यात आले 'झाडे लावा झाडे जगवा',परिसर ऑक्सीजनमय ठेवा.उन्हाळ्यामध्ये उन्हाचे चटके पासून बचाव करायचा असेल तर प्रत्येकानी निदान एक झाड लावून त्या झाडाचे पालन पोषण करावे असे आवाहन उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240