लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न.

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न.



प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

दि.२६ जून,२०२४ रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा गौरव सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.



कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक आर्वे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुलाचे माजी विभागप्रमुख डॉ.रविंद्र चिंचोळकर,एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे,अजित पाटील, कवयित्री प्रांजली मोहीकर,सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,मनपा पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे,Ask इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे राजकुमार बाके, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,सारा न्यूज नेटवर्कचे राम हुंडारे, दै.लोकशाही मतदारचे अक्षय बबलाद, उपेंद्र गायकवाड,महानगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक जयकुमार कांबळे,युवा चित्रकार सिद्धार्थ शिरसठ,बोधिवृक्ष फाउंडेशनचे उमाकांत राजगुरू,सोल्जर केदार उंबरजे,युवासेना तालुका उपाध्यक्ष अनिकेत लोंढे,ज्येष्ठ पत्रकार अनिल वाले, गायिका वाणीश्री सज्जन,गौरी बडदाळे,योगीराज अरळीमार,पत्रकार रोहीत मस्के यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शीवली व चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार हार तुरे आदींनी न करता पर्यावरण पूरक संदेश देण्यासाठी प्रत्येकी एक रोप देऊन प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.






कार्यक्रमाप्रसंगी सोलापुरातील युवा चित्रकार सिद्धार्थ शिरसठ यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे रेखाटलेले चित्र कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.उपस्थित मान्यवरांनी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या वतीने सुचवलेल्या या संकल्पनेला चित्रकार सिध्दार्थ शिरसठ यांनी रेखाटलेल्या शाहू महाराजांच्या चित्राचे तोंडभरून कौतुक केले, दरम्यान विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करुन सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पर्यावरण पूरक संदेश म्हणून प्रत्येकी एक रोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

 गुणीजन गौरव पुरस्कार प्राप्त पुरस्कर्ते खाप्रमाणे 

🔹 सोल्जर अरुणकुमार उडाणशिव -  देशसेवा .  

🔹बबलु गायकवाड - समाजसेवा 

🔹ॲड. रविंद्र दुलंगे - विधी सेवा

🔹 सविता गायकवाड -  मुख्याध्यापिका

🔹 डॉ. औदुंबर मस्के - आरोग्य सेवा 

🔹 श्री. यशपाल श्रीकांत वाडकर - सरपंच

🔹 श्रीमती मिरा देसाई - उद्योजिका

🔹 श्री विशाल सुर्वे - उद्योजकता विकास ट्रेनिंग 

🔹 श्री.श्रीकांत बुर्जे - पोलीस सेवा

🔹 अ.हमीद अ. रशीद हीरोली - सफाई निरीक्षक 

🔹 प्रा. डॉ. अंजना गायकवाड - निवेदिका

🔹 श्रीमती देवगणा इंगळे - सफाई कामगार 

🔹 श्री.महेंद्र जाधव - कनिष्ठ अभियंता 

🔹संभव फाऊंडेशन - मनोरुग्ण सेवा 

🔹 डॉ.लक्ष्मण राऊतराव - पशू सेवा

🔹 श्री बनशंकर चाबुकस्वार -  पोलीस (SRP) सेवा. 

'झाडांसाठी खड्डे तुम्ही मारा, रोपटे आम्ही देऊ त्याचबरोबर झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी दोघांची राहिल', असे आवाहन या कार्यक्रमाप्रसंगी बोधिवृक्ष फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहूल उडाणशिव, सिद्धार्थ भडकुंबे, अमोल वाघमारे, रमेश जाधव, डॉ.सिद्धार्थ तळभंडारे, किरण कांबळे,हरिष फडतरे,विनोद फडतरे,महेश गायकवाड, मंगेश दावणे, सतिश ढावरे, लकी जाधव, उमर फारूक शेख, सुरज थोरात, राजू वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास वनविभागाचे अधिकारी दिपक खलाणे आणि अजय भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे मुख्य संपादक संगप्पा कांबळे यांनी केले.

-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर