आमदार सुभाष देशमुखांच्या प्रयत्नातून इंगळगी शाळेचा डिजिटल विकास;इंगळगी शाळेसाठी ८ लाखांचा निधी मंजूर; विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक सुविधा.

दक्षिण सोलापूर (दि. २५)  
इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या प्रयत्नातून तब्बल ८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन तो शाळेला प्राप्त झाला आहे. हा निधी पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या निधीतून शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, प्रत्येक वर्गासाठी संगणक, शिक्षकांसाठी टेबल-खुर्च्या तसेच मुख्याध्यापकांसाठी सुसज्ज कार्यालयीन साहित्याचा समावेश आहे. याशिवाय शाळेसाठी विशेष एलईडी स्क्रीन बोर्डचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित साहित्याची खरेदी पूर्ण झाली असून येत्या आठवड्यात शाळेत त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक दर्जात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या उपक्रमाबद्दल सरपंच विनोद बनसोडे, उद्योजक शिवानंद हत्तुरे, पत्रकार राहुल वंजारे, भाजप सोशल मीडिया प्रमुख सागर धुळवे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांनी आमदार सुभाषबापू देशमुख यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.