सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात अव्वल- मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा गौरव.

सोलापूर, दि.३०(प्रतिनिधी) 
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना "उत्कृष्ट कार्यालय प्रमुख" म्हणून प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
सोलापूर जिल्हा परिषदेने सेवाकर्मी कार्यक्रमातील विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत १०० पैकी ८० गुण मिळवले आणि राज्यात अव्वल स्थान मिळवले. ज्येष्ठता सूची अद्ययावत करणे, पदोन्नती व सरळसेवा नियुक्त्या, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण तसेच सेवापुस्तक अद्ययावत ठेवणे या सर्व बाबींमध्ये जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कार्य केले.
सेवाकर्मी कार्यक्रमात आदर्श कामगिरी
ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यातील इतर सर्व जिल्हा परिषदांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला असून, राज्यासाठी आदर्श निर्माण केला आहे.
गुणांकनातील ठळक बाबी :
सर्व संवर्गांची ज्येष्ठता सूची अद्ययावत (१०/१० गुण)
पदोन्नती प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी (१०/१० गुण)
सरळसेवा नियुक्त्यांमध्ये समाधानकारक प्रगती (१०/१० गुण)
बिंदुनामावली प्रमाणीकरण जवळपास पूर्ण (१०/१० गुण)
अनुकंपा नियुक्त्यांमध्ये १००% अंमलबजावणी (१०/१० गुण)
iGOT प्रशिक्षणात ९५% पेक्षा जास्त सहभाग (१०/१० गुण)
सेवापुस्तक अद्ययावत ठेवण्यात ९९% यश (२०/२० गुण)
या यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे नेतृत्व, तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समन्वित प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.
प्रतिक्रिया :
“सेवाकर्मी कार्यक्रमातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर दिलेला भर यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेने प्रशासनातील कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. हा पुरस्कार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित असून, पुढील काळातही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.