महानगरपालिका कॅम्प परिसरातील आठ शाळांना न्यायाधीश पथकाची भेट; विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन

(प्रतिनिधी) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त न्यायाधीश पथकाने महानगरपालिका कॅम्प परिसरातील शाळांची पाहणी करत शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा, सुरक्षितता आणि स्वच्छतेचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात परिसरातील एकूण आठ शाळांची तपासणी करण्यात आली असून मुख्याध्यापक व शिक्षकांना गुणवत्तावाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी वर्गांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्याकडून वाचन करून घेतले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वाचन सादर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, शिस्तबद्ध शालेय व्यवस्थापन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे त्यांनी विशेष आवाहन केले.
भेटीदरम्यान शाळांमधील भौतिक सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पोषण आहार, वर्गखोल्या तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांची सविस्तर पाहणी करण्यात आली. मुख्याध्यापकांनी भेडसावणाऱ्या अडचणी व समस्या पथकासमोर मांडल्या. या समस्यांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन पथकाने दिले.प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव कादर शेख यांनी शिक्षकांशी संवाद साधताना डॉ. औटी यांच्या कार्याचा उल्लेख करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे जपून त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे,” असे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान पोलीस आयुक्त कार्यालयातून पोलीस उपनिरीक्षक अफरीन शेख, जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार जयश्री पंचे, कार्यकारी अभियंता कार्यालयातून उपअभियंता श्री. गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच उत्तर सोलापूर तालुक्याचे शिक्षण विस्ताराधिकारी बापूराव जमादारही यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.