संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम उत्साहात भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री सरस्वती मंदिर प्रशाला, दत्त घाट, गणपती चौक, सोलापूर येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी कीर्तन, भजन आणि प्रबोधनाची परंपरा समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शासन आध्यात्मिक परंपरा जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या हस्ते सोलापूर परिसरातील पात्र भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी आणि भावार्थदीपिका यांसारख्या ग्रंथांद्वारे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान सामान्यांच्या बोलीभाषेत मांडून समाजमनात प्रबोधनाची ज्योत पेटवली. समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनावर प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम संतपरंपरेचा आणि त्यांच्या विचारसंपदेचा गौरव करणारा ठरला.
या कार्यक्रमात ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ या संकल्पनेवर आधारित विशेष सादरीकरण करण्यात आले. तसेच प्रख्यात व्याख्याते तथा स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार श्री. गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मदर्शनावर आणि त्यांच्या विचारांच्या सामाजिक परिणामांवर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानयोग, भक्तियोग आणि समाजप्रबोधन या संतपरंपरेतील महत्त्वपूर्ण मूल्यांचा उलगडा करण्यात आला.
संतपरंपरेचे संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजात आध्यात्मिक जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमास सोलापूर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्याचे अभ्यासक तसेच भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240