आदर्श समाजसेवक पुरस्काराने अप्पासाहेब लंगोटे यांचा सन्मान.

प्रतिनिधी -सोलापूर 
ब्रिलियंट न्यूज चॅनेलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अप्पासाहेब लंगोटे यांना "आदर्श समाजसेवक पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, सोलापूर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूरचे डिन डॉ. ऋत्विक जयकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयकर, प्रा. भोजराज पवार, डॉ. विठ्ठल धडके, सौ. मया सिद्धे, सौ. मीना गायकवाड आणि ब्रिलियंट ग्रुपच्या अध्यक्षा कु. प्रणाली रासे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र उर्फ अप्पासाहेब लंगोटे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल "आदर्श समाजसेवक पुरस्कार" प्रदान करण्यात आला. डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, गुलाबाचे रोप आणि पुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. तसेच ब्रिलियंट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर यांचा अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने शाल, हार आणि मानाची टोपी घालून सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी प्रणाली रासे यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, गिरमल्ला गुरव, नितीन करजोळे, बी.एस. तांबोळी, महेश जाधव, सिध्दु पुजारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.