Posts

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतला योगाचा संकल्प.

Image
प्रतिनिधी -अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर), दि. २१ जून २०२६  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. नागनाथ म्हमाणे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे तसेच निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन एकाग्र होते आणि जीवनात सकारात्मकता वाढते, असे त्यांनी सांगितले.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीरंग बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मुक्त हालचालींचा सराव करून घेत विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने योगासनांचा सराव करत कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सौ. किर्ती जाधव मॅडम, सौ. राठोड मॅडम आणि सौ. बनसोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे मार्गदर्शन केले व त्यांची प्रात्यक्षिके दाखविली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे योगाभ्यास करून योगा...

राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त अंत्रोळी शाळेत अभिवादन; विद्यार्थ्यांना जिजाऊंच्या कार्याची ओळख.

Image
  प्रतिनिधी-अंत्रोळी,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा इतिहास, त्यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही जिजाऊंच्या कार्याबद्दल उत्सुकता दर्शवत कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे सर यांनी केले, तर पुष्पा बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ------------------------------------- 🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर  🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

स्वामींच्या वटवृक्षाची ऐतिहासिक गाथा ऐकून भारावलो – महावितरण संचालक धनंजय औंढेकर.

Image
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर व त्यांच्या पत्नी यांचा स्वागत व सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे व अन्य मान्यवर. प्रतिनिधी-अक्कलकोट, श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासाने पावन झालेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील ऐतिहासिक वटवृक्षाची गाथा ऐकून आपण भारावून गेलो असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी व्यक्त केले. नुकतीच धनंजय औंढेकर यांनी सपत्निक श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रथमच भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांना देवस्थानाची भौगोलिक रचना, मंदिरातील ऐतिहासिक वटवृक्षाचा इतिहास तसेच मंदिरातील दैनंदिन धार्मिक उपक्रमांची माहिती दिली.प्रारंभी चेअरमन महेश इंगळे यांनी धनंजय औंढेकर यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांचा व त्यांच्या पत्नीचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना औंढेकर म्हणाले, “वटवृक्ष हे केवळ एक झाड नसून स्वामी समर्थांचे जिवंत स्मारक आहे. १७० वर्षांहून अधि...

पूरात निकामी झालेल्या श्रवणयंत्राला नवा आधार; स्वराजच्या चेहऱ्यावर पुन्हा फुलले हास्य.

Image
प्रतिनिधी -सोलापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिऱ्हे येथील कर्णबधिर विद्यार्थी कु. स्वराज सत्यवान शेळके (इयत्ता ६ वी) याला नवीन श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. पूरामुळे निकामी झालेल्या जुन्या श्रवणयंत्राऐवजी नवीन यंत्र मिळाल्याने स्वराजच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. गतवर्षी पावसाळ्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे स्वराजच्या श्रवणयंत्रात पाणी शिरले होते. त्यामुळे ते पूर्णपणे बंद पडले आणि त्याला शालेय शिक्षणासह दैनंदिन संवादात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने तातडीने दखल घेत नवीन श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले. श्रवणयंत्राचे वितरण शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार आणि प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक शिरशीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक परमेश्वर गामाजी, विशेष शिक्षक आकाश शेंद्रे, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूरचे अमित शहा, विद्यार्थ्याचे पालक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यापूर्वीही शिक्षण विभागामार्फत स...

दुःखद निधन - श्रीमती नागर शंकर शिराळकर

Image
                               दुःखद निधन श्रीमती नागर शंकर शिराळकर (वय ९० वर्षे) यांचे दिनांक २०जून २०२६ रोजी रात्री सुमारे १२:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या ‘शिवनिर्णय’चे संपादक श्री. अनिल शिराळकर यांच्या मातोश्री होत. भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.🙏