आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतला योगाचा संकल्प.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. नागनाथ म्हमाणे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे तसेच निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन एकाग्र होते आणि जीवनात सकारात्मकता वाढते, असे त्यांनी सांगितले.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीरंग बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मुक्त हालचालींचा सराव करून घेत विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने योगासनांचा सराव करत कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी सौ. किर्ती जाधव मॅडम, सौ. राठोड मॅडम आणि सौ. बनसोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे मार्गदर्शन केले व त्यांची प्रात्यक्षिके दाखविली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे योगाभ्यास करून योगाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.
“योगामुळे निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ समाजाची निर्मिती होते,” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

----------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240