राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त अंत्रोळी शाळेत अभिवादन; विद्यार्थ्यांना जिजाऊंच्या कार्याची ओळख.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा इतिहास, त्यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही जिजाऊंच्या कार्याबद्दल उत्सुकता दर्शवत कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे सर यांनी केले, तर पुष्पा बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240