स्वामींच्या वटवृक्षाची ऐतिहासिक गाथा ऐकून भारावलो – महावितरण संचालक धनंजय औंढेकर.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर व त्यांच्या पत्नी यांचा स्वागत व सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे व अन्य मान्यवर.
प्रतिनिधी-अक्कलकोट,
श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासाने पावन झालेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील ऐतिहासिक वटवृक्षाची गाथा ऐकून आपण भारावून गेलो असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी व्यक्त केले.नुकतीच धनंजय औंढेकर यांनी सपत्निक श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रथमच भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांना देवस्थानाची भौगोलिक रचना, मंदिरातील ऐतिहासिक वटवृक्षाचा इतिहास तसेच मंदिरातील दैनंदिन धार्मिक उपक्रमांची माहिती दिली.प्रारंभी चेअरमन महेश इंगळे यांनी धनंजय औंढेकर यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांचा व त्यांच्या पत्नीचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना औंढेकर म्हणाले, “वटवृक्ष हे केवळ एक झाड नसून स्वामी समर्थांचे जिवंत स्मारक आहे. १७० वर्षांहून अधिक काळ लोटूनही हा वटवृक्ष आजही हिरवागार असून त्याच्या पारंब्या जमिनीत रुजून नवीन खोडांची निर्मिती झाली आहे. हा वटवृक्ष म्हणजे स्वामी समर्थांचेच साक्षात स्वरूप आहे. अक्कलकोटला येऊन स्वामींचे तसेच या ऐतिहासिक वटवृक्षाचे दर्शन घेतल्याने जीवन धन्य झाल्याची अनुभूती मिळाली.”
तसेच मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी चेअरमन महेश इंगळे यांचे आभार मानले.यावेळी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील माने, सोलापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी, सोलापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत तापकिरे, अक्कलकोट उपविभाग क्र. १ चे उपकार्यकारी अभियंता राजू आडम, अक्कलकोट उपविभाग क्र. २ चे उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास पडाळ, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, समर्थ स्वामी, तुषार मोरे, लखन सुरवसे, महेश मस्कले आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.