Posts

संघर्षातून घडलेले पत्रकारितेतील नेतृत्व; ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील न्हावेली या निसर्गरम्य आणि संस्कारांची परंपरा जपणाऱ्या गावातील सुपुत्र, महाराष्ट्र माझा 24 लाईव्हचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्रकारिता, समाजसेवा आणि जनहिताच्या कार्यातून त्यांनी निर्माण केलेल्या वेगळ्या ओळखीमुळे आज ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.समाजसेवेचा वारसा लाभलेल्या कुटुंबात वाढलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांचे आजोबा कै. पोलीस पाटील यशवंत गावडे हे गावातील मान्यवर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते, तर कै. जयराम गावडे यांनीही समाजकार्यातून आपला ठसा उमटविला होता. याच सामाजिक संस्कारांच्या बळावर त्यांनी जीवनातील संघर्षांना सामोरे जात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणासोबत पत्रकारितेचे व्यावसायिक शिक्षण घेत समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि अन्यायग्रस्त घटकांचा आवाज बनण्याचा निर्धार केला. संघर्षातून घडलेल्या या तरुणाने आपल्या मेहनतीच्...

शाळा प्रवेशोत्सव 2026-27 : जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांची मजरेवाडी केंद्रास भेट

Image
प्रतिनिधी-सोलापूर   शाळा प्रवेशोत्सव 2026-27 निमित्त सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी (कलेक्टर) कार्तिकेयन साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मजरेवाडी केंद्र, कुमठे येथे भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब, डायटचे प्राचार्य इब्राहिम नदाफ साहेब, केंद्रप्रमुख सिद्धराम वाघमोडे, पोषण आहार विभागाचे शेख सर व जमादार साहेब, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, नगरसेविका वैशाली भोपळे तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा, प्रवेशोत्सवाच्या उपक्रमांचा तसेच शाळेतील विविध सुविधांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा देत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण 18,700 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी 43,900 पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. -------------------------------------- 🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर  🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे  🔹 बातम...

सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांना ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सोलापूरचे सुप्रसिद्ध गायक, ‘सूरमणी’ तसेच ‘महाराष्ट्राचे महागायक’ स्पर्धेचे विजेते मोहम्मद अयाज यांना नुकताच प्रतिष्ठेचा ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मेयर सभागृहात आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मोहम्मद अयाज यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर मोहम्मद अयाज यांनी आपल्या गायनाचा ठसा देश-विदेशात उमटवला आहे. मंद्रूपसारख्या ग्रामीण भागातून प्रवास सुरू करून त्यांनी मलेशिया, सिंगापूर, दुबई, आफ्रिका, सौदी अरेबिया आदी देशांमध्ये आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली आहेत.त्यांच्या यशामुळे सोलापूरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात गौरवाने घेतले जात आहे. मोहम्मद अयाज यांनी सिद्धरामेश्वर भजन, आई तुळजाभवानीचा गोंधळ, स्वामी समर्थ महिमा, देशभक्तीपर गीते तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांवर आधारित अनेक ध्वनिचित्रफित...

ग्रामपंचायतींसाठी १६ वा वित्त आयोग; स्वच्छतेसाठी ५० टक्के निधी राखीव.

Image
  नवरत्न थीमची प्रभावी अंमलबजावणी करा – यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रतिनिधी -सोलापूर  शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी ‘नवरत्न थीम’ची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गावे स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध होतील, असे प्रतिपादन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते झाले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यशदाचे प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, प्रसाद काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते. डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले की, १६ व्या वित्त आयोगाच्या ८० टक्के बेसिक ग्रँटपैकी ५० टक्के निधी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनासाठी बंधनकारक स्वरूपात खर्च करावा लागणार आहे. तसेच अबंधित निधीपैकी किमान २५ ...

पोलीस मित्र सोशल फौंडेशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Image
  सोलापूर (प्रतिनिधी)  पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद, समन्वय व सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मित्र सोशल फौंडेशन चा पदग्रहण सोहळा सोलापूर येथील समाजकल्याण हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. वैशंपायन स्मृती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पत्रमहर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर फौंडेशनच्या नूतन पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र, ओळखपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जयकर यांनी सांगितले की, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून संस्थापक यशवंत पवार यांनी उभारलेले हे व्यासपीठ पोलीस व नागरिकांमधील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी माहिती देणे, नागरिकांमधील पोलीस...