Posts

ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज दि.३१ मे रविवारी भव्य कार्यगौरव सोहळा.

Image
प्रतिनिधी |सोलापूर  सोलापूर, प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ नेते हमीरसिंह ऊर्फ हेमू चंदेले यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार व कार्यगौरव समारंभ रविवारी (दि. ३१ मे) सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राचे उपाध्यक्ष प्रा. विलास बेत आणि सचिव रवींद्र मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विशेष सोहळ्याला खासदार शाहू शहाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राहणार आहेत.कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार रजनी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पवार, माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पुण्यश्लोक आहिल्...

“जनतेसाठी सीईओंचे दरवाजे खुले!”; सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आठवड्यातून दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी कुशल जैन यांनी नागरिकाभिमुख प्रशासनाचा वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागातून विविध समस्या, तक्रारी आणि मागण्या घेऊन जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना थेट आपली बाजू मांडता यावी यासाठी त्यांनी आठवड्यातून दोन दिवस भेटीची वेळ निश्चित केली आहे.सीईओ कुशल जैन यांनी दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत नागरिकांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवली आहे. या वेळेत जिल्ह्यातील कोणताही नागरिक जिल्हा परिषद मुख्यालयात येऊन आपल्या समस्या, तक्रारी किंवा सूचना थेट सीईओंसमोर मांडू शकतो. विशेष म्हणजे, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी त्यांनी पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धत अवलंबली आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर त्या विभागाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील तक्रारदाराला लेखी स्वरूपात कळविण्यात येतो. त्यामुळे तक्रारींच्या पाठपुराव्याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत असून प्र...

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

Image
अक्कलकोट | प्रतिनिधी  अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील श्री शिव सोमनाथ शिवाचार्य संस्थान मठ यांच्या मठाधिपतींचा पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात, वेदमंत्रांच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जगद्गुरु श्रीमद् रंभापुरी पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्नरेणुक डॉ. वीरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्य भागवत पाद बाळेहुन्नूर रंभापुरी यांच्या दिव्य सानिध्यात हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार पडला. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजता जगद्गुरुंसह श्री मुरुगेंद्र शिवाचार्य यांचे हिरेमठ येथे आगमन झाले. त्यानंतर श्री १०८ षटस्थल ब्रह्मी मुगेंद्र शिवाचार्य यांच्या कर्तृ समाधीसमोर महाउपदेश कार्यक्रम पार पडला. धर्मसभेत मार्गदर्शन करताना जगद्गुरूंनी करजगीतील मठाचा विकास आणि धार्मिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्व भक्तांनी तन, मन आणि धनाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता करजगी, बंकलगी, कुंभारी तसेच परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य धर्मसभा पार पडली.  यावेळी पूज्य श्री रेणुक देवरू यांना श्र...

महाबीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांना मातृशोक; लातूर येथे आज सायंकाळी अंत्यसंस्कार

Image
प्रतिनिधी -सोलापूर,  महाबीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई विरूपाक्षअप्पा स्वामी यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे स्वामी कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. श्रीमती कमलाबाई स्वामी या उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या देखील मातोश्री होत. त्यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वामींच्या वटवृक्षाची ऐतिहासिक गाथा ऐकून भारावलो - पोलीस आयुक्त एम. राजकुमार

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट             श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासाने पुनित झालेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील वटवृक्षाची गाथा ऐकून आपण भारावलो असल्याचे मनोगत भारतीय पोलीस सेवेतील सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी व्यक्त केले. नुकतेच पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रथमच भेट देऊन सपत्निक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची भौगोलिक रचना व मंदीरातील वटवृक्षाचा इतिहास, व मंदीरातील दीनक्रम प्रथमेश इंगळे यांच्या कडून जाणून घेतल्यानंतर पोलीस आयुक्त एम.राजकुमार बोलत होते. प्रारंभी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांचं स्वागत व दर्शनानंतर सपत्निक स्वामींचं कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.  पुढे बोलताना पोलीस आयुक्त एम.राजकुमार वटवृक्ष हा फक्त झाड नाही, स्वामी समर्थांचं जिवंत स्मारक आहे. १७० वर्षांपेक्षा जास्त झाले तरी हा वटवृक्ष आजह...