कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.
सोलापूर (प्रतिनिधी) कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने मुंबई मंत्रालयातील सहाय्यक पदासाठी निवड झाल्याबद्दल आरोग्य सेवक (MPW) अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम दि. ४ मे २०२६ रोजी कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्र येथे उत्साहात पार पडला.सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रप्रमुख डॉ. योगेश पल्लोलू यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत मुंबई मंत्रालयात सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल अमित कांबळे यांचा फेटा, शाल, पुष्पहार व पेढे वाटप करून सत्कार करण्यात आला. यावेळी जनता संघर्ष न्यूजचे मुख्य संपादक सिद्धार्थ भडकुंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रसंगी बोलताना डॉ. योगेश पल्लोलू म्हणाले की, “आरोग्य सेवक पदाची जबाबदारी सांभाळत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अमित कांबळे यांनी MPSC परीक्षेत यश संपादन करून प्रेरणादायी इतिहास घडविला आहे. त्यांची ही कामगिरी सर्वांसाठी आदर्शवत आहे.” यावेळी पत...