भाविकांच्या सोयी सुविधांना व भक्तांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे प्राधान्य-जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार

सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार व कुटुंबीयांचा सत्कार करताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे.
प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. २ मे २०२६
श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य सेवाभावी वृत्तीने व समर्पित भावनेने चालत असून भाविकांच्या सोयी-सुविधांना आणि सेवेला वटवृक्ष मंदिर समिती नेहमीच प्राधान्य देते, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी केले.
इंद्रजित पवार यांनी नुकतीच सहकुटुंब श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.यावेळी बोलताना पवार म्हणाले की, स्वामी समर्थांच्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर समिती अहोरात्र भाविकांच्या सेवेस तत्पर आहे. देवस्थानचा परिसर मर्यादित असतानाही वाढत्या गर्दीचे नियोजन प्रभावीपणे केले जात असून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे भाविकांना नियोजनबद्ध व सुलभ पद्धतीने स्वामी दर्शन घेता येत आहे.
मंदिर समितीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करताना पवार यांनी, “स्वामी सेवेप्रती असलेले मंदिर समितीचे समर्पित कार्य अभिमानास्पद आहे,” असेही नमूद केले.यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, शिवशरण अचलेर, अमर पाटील, खाजप्पा झंपले, विपूल जाधव, संतोष जमगे, श्रीकांत मलवे आदींसह भाविक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.