कार्यसम्राट न्यूजचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवशाली सोहळा.

सोलापूर (प्रतिनिधी)
अवघ्या दोन वर्षांत तब्बल ३ लाख ६५ हजार वाचकवर्ग निर्माण करत पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कार्यसम्राट न्यूजचा दुसरा वर्धापन दिन सोलापूर येथील समाज कल्याण केंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे, दैनिक शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर, दैनिक कर्मयोगीचे संपादक संजय पवार, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संपादक यशवंत पवार यांनी कार्यसम्राट न्यूजच्या दोन वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत समाजातील वंचित, पीडित व अन्यायग्रस्त घटकांच्या न्यायहक्कासाठी कार्यसम्राट न्यूजने सातत्याने आवाज उठविल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
‘प्रामाणिक पत्रकारांची समाजाला गरज’
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात प्रामाणिक पत्रकारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.
‘कार्यसम्राट न्यूजने विश्वासार्हता जपली’
पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांनी कार्यसम्राट न्यूजने सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी कधीही तडजोड केली नसल्याचे सांगितले.‘पत्रकारांच्या प्रश्नांवर यशवंत पवार आक्रमक’
फारूक मटके यांनी यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केल्याचे नमूद करत त्यांचे कौतुक केले.
समाजातील प्रश्न मांडणारे प्रभावी व्यासपीठ’
रामचंद्र सरवदे यांनी कार्यसम्राट न्यूज हे केवळ ऑनलाइन पोर्टल नसून तळागाळातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल कुलकर्णी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.