कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.

सोलापूर (प्रतिनिधी)
कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने मुंबई मंत्रालयातील सहाय्यक पदासाठी निवड झाल्याबद्दल आरोग्य सेवक (MPW) अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम दि. ४ मे २०२६ रोजी कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्र येथे उत्साहात पार पडला.सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रप्रमुख डॉ. योगेश पल्लोलू यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत मुंबई मंत्रालयात सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल अमित कांबळे यांचा फेटा, शाल, पुष्पहार व पेढे वाटप करून सत्कार करण्यात आला.
यावेळी जनता संघर्ष न्यूजचे मुख्य संपादक सिद्धार्थ भडकुंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रसंगी बोलताना डॉ. योगेश पल्लोलू म्हणाले की, “आरोग्य सेवक पदाची जबाबदारी सांभाळत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अमित कांबळे यांनी MPSC परीक्षेत यश संपादन करून प्रेरणादायी इतिहास घडविला आहे. त्यांची ही कामगिरी सर्वांसाठी आदर्शवत आहे.”
यावेळी पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे, आरोग्य निरीक्षक विठोबा सिंदीबंदी, अॅड. सुजित उडानशिव यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना अमित कांबळे म्हणाले की, “डॉ. योगेश पल्लोलू यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकाऱ्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मला परीक्षेत यश मिळविण्याची ऊर्जा मिळाली.” त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.यावेळी आरोग्य केंद्रातील आशियाबी शेख, संगीता सावंत, वैजयंती कांबळे, चंद्रकला सोनावणे यांनी अमित कांबळे यांना सप्रेम गोल्डन कलर घड्याळ भेट दिले.
कार्यक्रमास मोईन शेख, सलमान शेख, अबुबकर इंडीकर यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. योगेश पल्लोलू, जीएनएम आशियाबी शेख, नागेश चंद्री आदींनी परिश्रम घेतले.
---------------------------------------


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.